आमदार संजय गायकवाडांनी मेहकरात जाऊन दिला ईशारा, म्हणाले माझा हिशोब बाकी, एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही...वाचा नेमक घडल तरी काय...

 
sg

मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): . मेहकर शहरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने धार्मिक कारणावरून राडा केला. मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या  अल्पवयीन मुलीसमोर फटाका फोडला, तिची छेड काढली. तिला वाचवायला आलेल्यांना देखील लाठी काठी दगडांनी मारहाण केली. घरात घुसून सामानाची तोडफोड केली. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर काल ,आमदार संजय गायकवाड ४० - ५० वाहनांचा ताफा आणि शेकडो कार्यकर्ते घेऊन  मेहकरात पोहचले. मेहकरच्या ठाणेदाराला झाप झाप झापले..पोलिसांनी गुंडांवर गुन्हे दाखल केले असले तरी माझा हिशोब बाकी आहे ..त्यांची जमानत झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय सोडणार नाही असा इशारा आमदार संजय गायकवाड यांनी दिला..

jfk

fd

 मेहकर शहरातील मोळा रोडवर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी ४३ वर्षीय  नेहाताई काटकर यांच्या तक्रारीवरून २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार नेहाताई काटकर ह्या आमदार संजय गायकवाड यांच्या भाची आहेत.  त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या गल्लीतील महिलांसह मंदिरात दर्शनासाठी जात असताना  २० ते २५ जणांच्या टोळके हातात लाठ्या काठ्या घेऊन महिलांना आडवे आले. त्यातील १५ वर्षीय मुलीसमोर फटाका फोडला, अश्लील हावभाव करून मुलीची छेड काढली. सौ. काटकर यांच्या अंगावरील १ तोळा सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून घेतले.

ddf

  यावेळी तक्रारदार सौ . काटकर यांनी मदतीसाठी आरडाओरड केली तेव्हा त्यांचा मुलगा आणि त्याचा मित्र धावत आला.यावेळी टोळक्याने त्या दोघांनाही बेदम मारहाण केली.यावेळी सौ काटकर त्यांच्या घरात गेल्या असता गुंडांनी घरात घुसून सामानाची नासधूस केली, तोडफोड केली असे तक्रारीत म्हटले आहे.

 आमदार गायकवाडांनी मेहकरात जाऊन भरला दम...
   
दरम्यान काल सकाळीच आमदार संजय गायकवाड शेकडो कार्यकर्त्यांसह मेहकरात पोहचले.यावेळी घटनास्थळी जाऊन त्यांनी पाहणी केली. "हा वाद धार्मिक कारणावरून आहे, मंदिरात आरती का लावता? छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टेटस का ठेवता"..असल्या कारणांमुळे वाद झाल्याचे आमदार गायकवाड म्हणाले. आम्ही देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.. काल जवळ दिवाळी नसती तर एकेकाचे तुकडे केले असते. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी माझा हिशोब बाकी आहे.. त्यांची जमानत झाल्यावर एकेकाला तोडल्याशिवाय राहणार नाही.." असे आमदार संजय गायकवाड म्हणाले..

hyt

nk