आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांची ग्वाही... चिखली विधानसभा मतदारसंघात चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करणार!

 
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली विधानसभा मतदारसंघ हा तसा आरोग्य सुविधांपासून कोसो दूर असलेला आहे. या ठिकाणी कोणत्याही आरोग्य सुविधा नसल्याने नागरिकांना किरकोळ आजारासाठीसुद्धा बुलडाणा, अकोला, औरंगाबाद याठिकाणी जावे लागते. चिखली येथे उपजिल्हा रुग्णालय असले तरी त्याठिकाणी चांगल्या सुविधा आणि तज्‍ज्ञ डॉक्टरांची वाणवा आहे. अत्याधुनिक साहित्य नाही. त्यामुळे चिखली उपजिल्हा रुग्णालय हे १०० खाटांचे करून त्याठिकाणी ट्रामा केअर सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहे. अमडापूर, उंद्री, रायपूर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जावाढ करून ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव शासन दरबारी सादर केलेला आहे. तसेच साखळी येथे स्वतंत्र प्राथमिक आरोग्य केंद्राचाही प्रस्ताव सादर केलेला आहे. चिखली येथे कोरोना काळात तिसरी संभाव्य लाट डोळ्यासमोर ठेवून समर्पित कोविड रुग्णालयास मान्यता घेऊन त्याठिकाणी ऑक्सिजन प्लांटसुद्धा लावून घेतला आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य, उपकेंद्र , ग्रामीण रुग्णालय याठिकाणी जास्तीत जास्त चांगल्या आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मी सातत्याने पयत्न करीत असून येत्या काही दिवसांत चिखली विधानसभा मतदारसंघात पुरेशा आरोग्य सुविधा निर्माण करण्यास यश येईल, असा आशावाद आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी अमडापूर येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना व्यक्त केला.

23

आज, ३१ जानेवारीला आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या प्रयत्नाने डॉक्टर फॉर यू या सामाजिक संस्थेच्या वतीने अमडापूर प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मिळालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण आ. सौ. महाले पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

अमडापूर नगर पंचायतीसाठी प्रयत्न करणार
अमडापूर हे गाव लोकसंख्येच्या दृष्टीने खूप मोठे गाव आहे. हे गाव ग्रामपंचायतीमधून नगर पंचायतसाठीचे निकष पूर्ण करते. अमडापूर येथील ग्रामस्थांनी या ठिकाणी नगरपंचायत व्हावी, अशी मागणी केलेली असल्याने त्यासाठी सुद्धा प्रयत्न करणार असल्याचे आमदार सौ. श्वेताताई महाले यांनी यावेळी सांगितले.

जनतेने जनतेसाठी झटणाऱ्याच्या पाठिशी उभे रहावे- बबनराव गिऱ्हे
आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील सतत मतदारसंघाच्या विकासासाठी झटत असताना दिसत आहेत. विविध शासकीय योजनांतून कामे खेचून आणत आहेत. एवढेच नव्हे तर विविध सामाजिक संस्थांकडूनही विविध कार्यक्रम राबवून मतदारसंघातील जनतेच्या भल्यासाठी त्या प्रयत्न करीत आहे. आजच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण हे त्याचेच द्योतक आहे. आ. सौ. श्वेताताई महाले पाटील सतत जनतेसाठी झटत असल्याने जनतेने जनतेसाठी झटणाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन अमडापूर येथील सामाजिक कार्यकर्ते व जगदंबा नागरी पतसंस्था अध्यक्ष बबनराव गिऱ्हे यांनी भाषणातून केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा केला सत्कार
कोरोना काळामध्ये जीवाची परवा न करता जनतेच्या जिवाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या अमडापूर येथील आरोग्य कर्मचाऱ्यांना, नर्स व डॉक्टरांचा आमदार श्वेताताई महाले यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी सभापती सौ. सिंधुताई तायडे होत्या. यावेळी उपसभापती शमशाद शाहिद पटेल, भारत शेळके, डॉ. कृष्णकुमार सपकाळ,  संजय महाले, प्रसाद देशमुख, एकनाथराव जाधव, प्रा. वीरेंद्र वानखेडे, विकास डाळिंमकर, अर्जुन नेमाडे, अनमोल ढोरे पाटील, प्रशांत पाखरे, सुधाकर मोरे, अक्षय अदमाने, सुनील शेळके, महादेव उमाळे, सौ. शीला धुरंधर, पुरुषोत्तम जाधव, गणेश यंगड, डॉ. सांगळे, विनोद सिताफळे, संजय पाटील, नारायण कुटे, सचिन गरड, राम देशमुख, गजानन दुधाळे, गजानन देशमुख, प्रवीण सेठ खंडेलवाल, राजू अंभोरे, गणेश यंगड, शिवा भागवत, रमेश देढे, नंदकिशोर जुमडे, गणेश आदमाणे, मेडिकल ऑफिसर डॉ. देवेंद्र बावस्कर, डॉ. अभय तायडे, अनिल लोखंडे, सुनील हमीले  यांच्यासह परिसरातील नागरिक व आशा सेविका, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन बबनराव राऊत यांनी केले.