आमदार अपात्रतेचा उद्या निकाल! आमदार संजय गायकवाडांचे "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना मोठे विधान! आ. रायमुलकरांनीही मनातलं सांगितलं...वाचा...

 
Mla
बुलडाणा(कृष्णा सपकाळ:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी उद्या,१० जानेवारीला निकाल जाहीर करणार आहेत. अख्ख्या राज्याचे लक्ष याकडे लागून आहे..उद्याच्या निकालावर अनेक राजकीय सत्ता - समीकरणे अवलंबून आहेत.. बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचेही याकडे लक्ष राहील. कारण जिल्ह्यातील दोन आमदारांच्या अपात्रतेचा फैसला उद्या होणार आहे..
शिवसेनेत फूट पडल्यानंतर आ.संजय रायमुलकर आणि आ.संजय गायकवाड एकनाथ शिंदेंची साथ पकडण्यात आघाडीवर होते. दोन्ही आमदार "त्या" रात्री सुरत मध्ये पोहचले होते. दरम्यान आता उद्याच्या निकालावर बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय गायकवाड यांनी भाष्य केले आहे.
   देशात लोकशाही आहे. घटनेत बहुमताला महत्व आहे. आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे. आम्ही काहीही घटनाबाह्य केलेले नाही ,त्यामुळे उद्याचा निकाल हा आमच्याच बाजूने लागेल. आमचे कोणतेही आमदार अपात्र होणार नाहीत. सध्याच्या सरकारचा उर्वरित कार्यकाळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण करतील असे आ. संजय गायकवाड बुलडाणा लाइव्ह शी बोलतांना म्हणाले. "जर उद्याचा निकाल विरोधात आला तर" असा सवाल केला असता "तसे होणारच नाही" असे आ. गायकवाड ठामपणे म्हणाले.
आ. संजय रायमुलकर म्हणाले.....
उद्याचा निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास आहे. 
आमच्याकडे बहुमत आहे,आणि लोकशाहीत बहुमताचा सन्मान केल्या जातो. काहीही झाले तरी न्यायदेवतेच्या निकालाचा आम्ही सन्मानाने स्विकार करू असे आ.संजय रायमुलकर "बुलडाणा लाइव्ह" शी बोलतांना म्हणाले.