आमदार धिरज लिंगाडे आज बुलडाण्यात येणार! बुलडाणेकर करणार जंगी सत्कार

 
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघात भाजपच्या रणजित पाटलांना पराभवाची चव चाखायला लावत दणदणीत विजय संपादन करणारे आमदार धिरज लिंगाडे आज विजयानंतर प्रथमच बुलडाणा शहरात येत आहेत. कारंजा चौकातून त्यांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात येणार असून गांधी भवनात भव्य नागरी सत्काराचा कार्यक्रम पार पडणार आहे.
दुपारी १ वाजेपासून या मिरवणुकीला सुरुवात होईल. तत्पूर्वी खामगाव मार्गे बुलडाणा शहरात आल्यानंतर मोठ्या देवीचे दर्शन आमदार धिरज लिंगाडे घेणार आहेत.   रणजित पाटलांचा पराभव करून आमदार होणारे धिरज लिंगाडे पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व करणारे पहिले बुलडाणेकर ठरले आहेत. याआधी लिंगाडे यांचे वडील माजी गृह राज्यमंत्री हे सुद्धा विधानपरिषद सदस्य होते. मात्र ते विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य मतदार संघातून निवडून आले होते. दरम्यान लिंगाडे कुटुंबीयांनी हा विजय स्व. रामभाऊ लिंगाडे व समस्त पदवीधरांना समर्पित असल्याचे कालच म्हटले होते.