आमदार धीरज लिंगाडेंचे अजुनही भाजपच्या अशोक चव्हाणांवर प्रेम? नेमका विषय काय...

 
Lingade
बुलडाणा(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): आता बातमीचे शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल हे काय नवीन आणलं..? आमदार धीरज लिंगाडे तर काँग्रेसचे हाय..तसे ते आधी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पण होते म्हणा.. पण विधानपरिषदेची जागा काँगेसकडे होती, त्यामुळे अतिशय सहमतीने ,खेळीमेळीने त्यांचा काँग्रेस प्रवेश झाला..जुन्या पेन्शन च्या मुद्द्यावर त्यांना आमदारकीची लॉटरीही लागली..एकंदरीत त्यांचं तसं बरं चालू हाय...तर असो, आपला मुद्दा आहे तो आ. लिंगाडे यांच्या
भाजपच्या अशोक चव्हाणांवरील प्रेमाचा.. होय अशोक चव्हाण आता भाजपमध्ये आहेत,आजकाल कोण कधी कोणत्या पक्षात जाईल याचा नेम नाही, त्यामुळे अनेकदा आठवण करून द्यावी लागते..तर अशोक चव्हाण १३ फेब्रुवारी २०२४ ला भाजपमध्ये गेले, आता ते राज्यसभेचे खासदार आहेत..
तर त्याच असं हाय की बुलडाणा बसस्थानकाजवळील पत्रकार भवनाजवळ आ. लिंगाडे यांचे कार्यालय हाय..कार्यालयाबाहेर तसा बोर्ड आ. लिंगाडेंनी लावलांय..आता जेव्हा हा बोर्ड लावला तेव्हा अशोक चव्हाण काँगेसमध्ये होते..त्यामुळे वरिष्ठांचे फोटो बोर्डवर असावेत या प्रामाणिक उद्देशाने आ. लिंगाडे यांनी त्यात अशोक चव्हाणांचा फोटो ठेवला. पण चव्हाण काँगेससोबत "अप्रामाणिक" झाले अन् एवढं सगळ काँग्रेसने देऊनही भाजपात गेले..
आता अशोक चव्हाण जाऊन.."सॉरी..भाजपात जाऊन" ५ महिने होऊन गेलेत पण आ. लिंगाडेंच्या कार्यालयाबाहेरील बोर्डवर अशोक चव्हाण कायम आहेत..त्यामुळे सहंज वाटल की काँग्रेसच्या आ. लिंगाडेंचे भाजपच्या अशोक चव्हाणांवर अजूनही प्रेम वैगेरे तर नाही ना?
Lingade