मंत्री सुनील केदार ७ नोव्‍हेंबरला येणार बुलडाण्यात!

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्‍धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री 7 नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहे.
त्यांचा दौरा कार्यक्रम असा ः 7 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.43 वा. मलकापूर रेल्वे स्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने बुलडाण्याकडे प्रयाण, दुपारी 1.40 वा शासकीय विश्रामगृह बुलडाणा येथे आगमन व राखीव, दुपारी 4 वाजता तालुका क्रीडा संकुल, बुलडाण्याच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 4.30 वाजता सहकार विद्या मंदिर येथे महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना व बुलडाणा जिल्हा धनुर्विद्या संघटनेद्वारा आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनिअर धनुर्विद्या स्पर्धेच्‍या उद्‌घाटन कार्यक्रमास उपस्थिती, कार्यक्रम संपल्यानंतर सोयीनुसार शासकीय विश्रामगृह, बुलडाणा येथे आगमन व राखीव, सायंकाळी 7.30 वाजता बुलडाणा येथून मलकापूर रेल्वे स्थानकाकडे प्रयाण, रात्री 8.30 वा मलकापूर रेल्वेस्थानक येथे आगमन व राखीव, रात्री 9 वा. मलकापूर येथून हावडा – पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसने कोपरगाव जि. अहमदनगरकडे प्रयाण करतील.