खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचारार्थ मंत्री संजय राठोड आज जिल्ह्यात! मेहकर व सिंदखेडराजा तालुक्यात बंजारा समाजाच्या मेळाव्याला करणार संबोधित..

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी राज्याचे मंत्री तथा बंजारा समाजाचे नेते संजय राठोड आज बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मेहकर तालुक्यातील मोहना व सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी येथे ते बंजारा समाजाच्या मेळाव्यांना संबोधित करणार आहेत.
महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी महायुती जोमाने कामाला भिडली आहे. काल, बुलडाणा शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकारी मेळावा आणि समाजातील बुद्धिजीवी वर्गाशी संवाद साधला. खा.प्रतापरावांना मत म्हणजे मोदींना मत असे म्हणत त्यांना चौथ्यांदा संसदेत पाठवण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दरम्यान आज,१५ एप्रिलला मंत्री संजय राठोड जे बंजारा समाजाचा मेळावा घेणार आहेत.सकाळी ११ वाजता मेहकर तालुक्यातील मोहना येथे तर दुपारी १ वाजता सिंदखेडराजा तालुक्यातील बिबी येथे संजय राठोड बंजारा समाजाच्या मेळाव्यांना संबोधित करतील. या मेळाव्यांना बंजारा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.