मंत्री, हिरो कुणीबी आणा, विजयी होणार फक्त पाना!चांडोळ, कोथळी, धामणगाव बढेतील सभेत जनतेचा निर्धार;रविकांत तुपकर म्हणाले,सर्व शक्ती एकत्र आल्यातरी शेतकऱ्याच्या लेकराला रोखु शकत नाही

 
Bk
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एकीकडे डझनभर नेते, मंत्री आणि दुसरीकडे एकटा अपक्ष उमेदवार अशी अवस्था सध्या जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचा उमेदवार असलेल्या रविकांत तुपकर नावाचे वादळ रोखण्यासाठी विरोधकांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. प्रचारासाठी मुख्यमंत्री, विविध नेते आणि हिरो देखील आणले जात आहे. परंतु आता मंत्री - हिरो कुणीबी आणा, विजयी होणार फक्त 'पाना', असा निर्धार बुलडाणा तालुक्यातील चांडोळ, मोताळा तालुक्यातील कोथळी व धामणगाव बढे येथील सभेत जनतेने केला. मायबाप जनतेचे प्रेम, आशिर्वाद पाठिशी असल्याने आता आपल्या विरोधात सर्व शक्ती आली तरी शेतकऱ्याच्या लेकराला कुणी रोखु शकत नाही, विजय आपलाच आहे, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी सभेत बोलतांना केला.
Advt
advt.👆​​​​​​
​​​
  सर्वसामान्य जनतेचे अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांच्या प्रचारार्थ २२ एप्रिल रोजी चिखलीत विराट अशी रॅली निघाली व विक्रमी सभा देखील पार पडली. त्यापूर्वी चांडोळ येथे देखील रॅली व सभा पार पडली तर मोताळा तालुक्यात कोथळी आणि धामणगाव बढे या ठिकाणच्या सभा देखील रेकॉर्ड ब्रेक ठरल्या. ठिकठिकाणी नागरिकांनी रविकांत तुपकर यांचे स्वागत करुन 'विजयी भव' असा आशिर्वाद दिला. सभेत बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, तरुण, महिला तसेच ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्य जनता, मध्यमवर्गीय, नोकरदार, व्यावसायीक अशा सर्वच घटकातून आपल्याला प्रचंड समर्थन आणि आशिर्वाद मिळत असल्याचे पाहून विरोधकांचे धाबे दणाणले आहे. मुख्यमंत्र्यांना वारंवार बुलडाण्यात यावे लागत आहे, अगदी गल्ली बोळात फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री, मंत्री, नेते, पुढारी यांना आणावे लागत आहे, एवढच काय तर हिरो देखील आणावा लागतो यावरुन त्यांनी आपली धास्ती घेतल्याचे स्पष्ट होते. एक सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला रोखण्यासाठी ही सर्व शक्ती एकवटली आहे, हा सर्वसामान्य जनतेच्या आशिर्वादाचा परिणाम आहे. सर्वसामान्य जनता माझ्या पाठिशी भक्कमपणे असल्याने विरोधकांचे दाबे दणाणले आहेत. 
बुलडाणा
  महायुती आणि आघाडी या दोन्हीकडून केवळ रविकांत तुपकर हेच टार्गेट केले जात आहे. विकासाचे मुद्दे, जिल्ह्यातील प्रश्न, शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य जनता, बेरोजगारी यापैकी कशावर विरोधक बोलत नाही ते फक्त रविकांत तुपकर या एका नावावरच बोलतात. स्वत:च त्यांच्याजवळ सांगायला काही नसल्याने माझ्या विरोधात खोटे आरोप पसरवितात, खोट्या अफवा पसरवितात परंतु आता जनता सर्व जाणून आहे म्हणूनच मला आशिर्वाद देत आहे. कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका, माझा विजय हा प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा विजय आहे, त्यामुळे रविकांत तुपकर यांच्या विजयासाठी नव्हे तर प्रत्येकाने आपल्या स्वत:च्या विजयासाठी मतदान होईपर्यंत जागृत आणि दक्ष राहावे, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले. तर उपस्थित जनसमुदयाने 'मंत्री, हिरो कुणीबी आणा, विजयी होणार फक्त पाना' अशी नारेबाजी करत रविकांत तुपकर यांना 'विजयी भव'चा आशिर्वाद दिला.