POLITICAL SPECIAL बूथ कमिटीचे सदस्य करणार संदीप शेळकेंचा मार्ग सुकर! ३ फेब्रुवारीला बुलडाण्यात बूथ कमिटी मेळावा;

१२ हजार "विजयदुत" एकत्रित येऊन करणार विजयाचे प्लॅनिंग...
 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणुकपूर्व तयारीत राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलडाणा मिशन या राजकीय लोकचळवळीचे संकल्पक संदीप शेळके यांनी चांगलीच भरारी घेतली आहे. आतापर्यंत सहाही विधानसभा मतदारसंघातील विविध गावांत त्यांनी जाहीरनामा जनतेचा या अभिनयाना अंतर्गत संवाद मेळावे घेतलेत. आता येत्या ३ फेब्रुवारीला महत्वपूर्ण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. बुलडाण्यात बूथ कमिटी सदस्यांचा मेळावा होणार आहे.लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाचे प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी असून हा मेळावा संदीप शेळके यांच्या विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी मदतीचा ठरणार आहे.
  ३ फेब्रुवारी रोजी बुलडाणा शहरातील चिखली रोडवरील साईकृपा लॉन्स येथे हा मेळावा होणार आहे. याआधी वन बुलडाणा मिशनचे घेतलेला बूथ बांधणी मेळावा सुद्धा चांगलाच राजकीय चर्चेचा विषय ठरला होता. दरम्यान वन बुलडाणा मिशनने आतापर्यंत १२ ०० पेक्षा अधिक बूथ ची बांधणी पूर्ण केली आहे, उर्वरित बूथ बांधणी देखील पुढच्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे. ३ फेब्रुवारीला होणाऱ्या मेळाव्यात प्रत्येक बूथ प्रमुख व कमिटी सदस्य सहभागी होणार आहेत. १२०० हजार विजयदुत या मेळाव्यात सहभागी होणार असल्याचे वन बुलडाणा मिशनच्या प्रसिध्दी विभागाने कळवले आहे 
विजयाचे प्लॅनिंग..
गाव तिथे बूथ कमिटी असे पक्के नियोजन वन बुलडाणा मिशनच्या वतीने करण्यात आले आहे. एकीकडे इतर इच्छुक उमेदवारी उमेदवारी मिळेल की नाही या संभ्रमात असताना संदीप शेळके यांची तयारी मात्र अतिशय जोरात पण तेवढेच सूक्ष्म नियोजन करून सुरू आहे. अर्थातच या तयारीचा फायदा संदीप शेळके यांना लोकसभा निवडणुकीत होणार आहे.