अखेर मेहकरचे काँग्रेस पुढारी झोपेतून उठले; "बुलडाणा लाइव्ह" च्या बातमीनंतर आली जाग! राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्याचा केला निषेध
Mar 28, 2023, 10:26 IST
मेहकर( अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर व राहुल गांधींची खासदारकी रद्द झाल्यानंतर झोपेत असणाऱ्या मेहकरच्या काँग्रेस पुढाऱ्यांना अखेर जाग आली. मेहकरच्या काँग्रेस पुढाऱ्यांना "राहुल गांधीचे काही देणे घेणे नाही" अशा आशयाचे वृत्त बुलडाणा लाइव्ह ने प्रकाशित केल्यानंतर सगळ्या पुढाऱ्यांनी एकत्र येऊन राहुल गांधीची खासदारकी रद्द केल्याबद्दल केंद्र सरकारचा निषेध केला. बुलडाणा लाइव्ह च्या "त्या" बातमीची काँग्रेस वर्तुळात चांगलीच चर्चा झाली, दुसऱ्या फेरीतील नेत्यांनी तर तुम्ही खरचं लिहिलं राव असे म्हणत बातमी तुफान व्हायरल केली.
मेहकर शहर व तालुका काँगसने काल,२७ मार्चला केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन केले. सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप श्याम उमाळकरांनी केला. लोकशाही संपवण्याचा भाजपचा डाव असल्याचेही ते म्हणाले.लक्ष्मण घुमरे, विलास चनखोरे, दिगंबर मवाळ, विनायकराव टाले या नेत्यांचीही भाषणे झाली. तालुकाध्यक्ष देवानंद पवार, भीमशक्तीचे कैलास सुखदाने, भास्करराव ठाकरे, चित्रांगण खंडारे, शैलेश बावस्कर, वसंतराव देशमुख ,आरतीताई दीक्षित, रवी सावजी, उस्मान शहा, संजय म्हस्के, रियाज कुरेशी, डॉ. शेषराव बदर, नितीन तुपे, शाहू गवळी, संजय सुळकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.