अपक्ष रविकांत तुपकरांच्या बैठक, रोड शो, सभांना तोबा गर्दी! उत्स्फूर्त प्रतिसाद की विजयाची नांदी? राजकीय विश्लेषकही चक्रावून गेलेत...

 
Gbvv
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची साधी बैठक ,रॅली रोड शो वा सभांना मिळणारा दणदणीत प्रतिसाद व उसळणारी तोबा गर्दी याने विरोधकच नव्हे तटस्थ राजकीय विश्लेषक देखील चक्रावून गेले. हा उत्स्फूर्त प्रतिसाद की विजयाची नांदी असा सवाल मतदारसंघाच्या राजकीय ऐरणीवर उपस्थित झाला आहे. 
बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची यंदाची लढत अभूतपूर्व व सर्वार्थाने विक्रमी ठरली आहे. १९५२ पासूनच्या लोकसभा निवडणुकांचे विश्लेषण केले तर ती ही निवडणूक १९८९ च्या वादळी निवडणूकीची आठवण करून देणारी वा त्या वळणावर गेल्याचे दिसून येत आहे. त्या लढतीत प्रबळ नेते मुकुल वासनिक विरुद्ध रस्त्यावरचा फाटका, फकीर माणूस सुखदेव नंदाजी काळे अशी लढत होती. सशक्त व दिल्ली ते गल्ली सत्ताधारी असलेल्या काँग्रेसचे मोठे नेते व खासदार असले तरी वासनिकाविरुद्ध अँटिइन्कबन्सी ची लाट होती. मतदारात प्रस्थापित नेत्यांविरुद्ध चीड , परिवर्तनाची जिद्द होती. अगदी तशीच स्थिती यंदाच्या लढतीत देखील आहे.अपक्ष व लोकवर्गणीतून लढणाऱ्या तुपकरांना मिळणारा प्रचंड प्रतिसाद, त्यांच्या मदतीसाठी धावून येणारे हजारो हात, प्रचारात उसळणारा जनसागर हे सर्व चक्रावून टाकणारे आहे. 
एल्गार चा जोश प्रचारातही कायम..
ऐतिहासिक एल्गार मोर्च्यापासून त्यांना मिळणारा प्रतिसाद सध्या सुरू असलेल्या प्रचारात नुसताच कायम नाही, तर त्यात तिप्पटीने वाढ झाली आहे. मोर्च्या चे रेकॉर्ड लोकसभेचा अर्ज भरण्याच्या दिवशीच मोडला गेला! त्यामूळे झालेला माहौल, टेम्पो प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यातही कायम आहे. कॉफी विथ तुपकर असो, बुद्धिजीवी-व्यापारी बैठक असो की रॅली, रोड शो वा जाहीर सभा प्रत्येक ठिकाणी उत्स्फूर्त, भरघोस प्रतिसाद ठरलेलीच असे चित्र आहे. विरोधी पक्षांचे बालेकिल्ले असलेल्या सहाही विधानसभा मतदारसंघात तुपकरांचा प्रचार सुपर हिटच ठरला! 20 तारखेला खामगाव मध्ये रणरणत्या उन्हात झालेला जंगी रोड शो तुपकरांच्या ताकदीचा, लोकप्रियतेचा कळस ठरला. स्वत:हून जमणारा हा जनसागर रविकांत तुपकरांच्या विजयाची नांदी असल्याची व्यापक चर्चा यामुळेच सुरू झाली आहे...