BREAKING सोयाबीन कापसाच्या प्रश्नांवर रविकांत तुपकर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यातील बैठकीला सुरुवात!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही बैठकीला उपस्थित! मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात होत असलेल्या बैठकीतील निर्णयाकडे साऱ्यांचे लक्ष...

 
rt
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): सोयाबीन कापसाच्या दरवाढी संदर्भात शेतकरी  नेते रविकांत तुपकर यांची केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत पूर्वनियोजित असलेली बैठक सुरू झाली आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक होत असून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित आहेत.
 

२९ डिसेंबरला मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी गेल्यानंतर रविकांत तुपकर यांना राज्य सरकारने चर्चेला बोलावले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुपकर आणि त्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली होती. या बैठकीत राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या होत्या. सोयाबीन आणि कापसाची दरवाढ आणि सरसकट दुष्काळ जाहीर करण्याचे विषय केंद्र सरकारच्या अधीन येत असल्याने केंद्र सरकारसोबत बैठक लावण्याचा शब्द फडणवीस यांनी तुपकर यांना दिला होता. दिलेल्या शब्दाप्रमाने काल,८ डिसेंबरला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तुपकर यांना वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबतच्या बैठकीचे निमंत्रण आले. आज,९ डिसेंबरच्या सकाळी तुपकर मुंबईकडे रवाना झाले होते. थोड्या वेळापूर्वी  साडेआठ वाजेच्या सुमारास वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह्याद्री अतिथीगृहावर पोहचले असून त्याआधीच रविकांत तुपकर सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले होते. 

    तुपकर यांची वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्यासोबत बैठक सुरू झाली आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस देखील या बैठकीत असून तेदेखील तुपकर यांची बाजू वाणिज्य मंत्र्यांना अवगत करून देणार आहेत. सोयाबीन कापसाच्या दरवाढीसारख्या महत्वाच्या विषयावर ही बैठक होत असल्याने  या बैठकीकडे राज्यभरातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे..