Amazon Ad

राजर्षी शाहू मल्टिस्टेट, वन बुलढाणा मिशन व गोदावरी फाऊंडेशनच्या वतीने वैदकीय कॅम्प; ३२ रुग्णांवर जळगावात होणार मोफत उपचार ! रुग्णांना घेऊन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयाची बस रवाना..

 
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शस्त्रक्रिया करण्याची गरज असलेल्या ३२ रुग्णांना घेऊन आज सकाळी जळगाव खानदेश येथील गोदावरी फाऊंडेशनच्या रुग्णालयाची बस रवाना झाली. त्याठिकाणी त्यांच्यावर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. राजर्षी शाहू मल्टिस्टेट, वन बुलढाणा मिशन व गोदावरी फाऊंडेशनने याकरिता पुढाकार घेतला आहे. 
संग्रामपूर येथे ८ जून रोजी आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले होते. तज्ञ डॉक्टरांनी २५० रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले होते. तर काही रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला होता. गरजू रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेऊ अशी ग्वाही राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी दिली होती. दरम्यान शुक्रवारी ३२ रुग्णांना जळगाव खानदेश येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना करण्यात आले. यशस्वी शस्त्रक्रिया झाल्यानंतर आपण आजारातून पूर्णपणे बरे होणार आहोत या गोष्टीचा आनंद प्रत्येक रुग्णाच्या चेहऱ्यावर झळकत होता.यावेळी आशिष अवचार,पासमासे गुरुजी, श्याम उमरकर, शरद अवचार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 
संदीप शेळके म्हणतात, आरोग्य सेवा हीच खरी जनसेवा! 
गरजू रुग्णांना मोफत उपचार मिळवून देण्यासाठी राजर्षी शाहू परिवाराने नेहमीच पुढाकार घेतला आहे. भविष्यातही आपण यासाठी बांधील आहोत. आरोग्यसेवा हीच खरी जनसेवा आहे.