संविधान जागर यात्रेला सहाव्या दिवशी मोठा प्रतिसाद!

साखळी बु गावात ढोल ताशांनी यात्रेचे स्वागत! साखळी खू, पांगरी उबरहंडे, व केसापुरातील ग्राम फेरीत उसळली गर्दी, राहुल बोंद्रे म्हणाले, दिवसागणिक जनतेच प्रेम वाढतयं! 
 
चिखली
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) संविधान जागर यात्रेला आज, ३ फेब्रुवारीला मोठा प्रतिसाद दिसून आला. सहाव्या दिवशी यात्रा साखळी बुद्रुक गावात पोहोचली, ढोल ताशांच्या गजर करून गावकऱ्यांनी उत्साहात यात्रेचे स्वागत केले. पुढे सकाळी खु., पांगरी उबरहंडे केसापूर या गावातील ग्राम फेरीत देखील मोठी गर्दी उसळली होती. याप्रसंगी संविधान जागर यात्रेला सामान्य जनतेचे प्रेम दिवसागणिक वाढत असल्याचे काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे म्हणाले.
 ११ दिवस ,१०२ गावे, ७०० किलोमीटरचा प्रवास अशी एकुण रूपरेषा यात्रेची आहे. यात्रेचा सहावा दिवस सुरू आहे. आतापर्यंत ४०० किलोमीटर प्रवास यात्रेने पूर्ण केला. सकाळी संविधान जागर यात्रा साखळी बुद्रुक गावात पोहचली. त्यावेळी गावकऱ्यांनी ढोल ताशा वाजवून जल्लोषात यात्रेचे स्वागत केले. इतकंच नाही ग्राम फेरीतील सहभागी सदस्यांना फेटे बांधण्यात आले. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघात संविधानाचा जागर होतो आहे, जनतेचे दिवसागणिक प्रेम यात्रे विषयी वाढले असल्याचे राहुल बोंद्रे म्हणाले. २७ जानेवारीपासून चिखली विधानसभा मतदारसंघात संविधान जागर यात्रा सुरू आहे. आज यात्रेचा मुक्काम रायपूर या गावी होणार आहे.