मातृतीर्थ सिंदखेडराजा आणि लोणार सरोवराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक! आ. डॉ.राजेंद्र शिंगणेंनी केली महत्वाची मागणी! उपमुख्यमंत्री म्हणाले...

 
जन्फज
सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मभूमी तथा जगप्रसिद्ध लोणार सरोवर च्या विकासाकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थित आज,९ जानेवारीला मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री ना. वळसे पाटील, आमदार तथा माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, आ. संजय रायमूलकर व संबंधित विभागांतील अधिकारी उपस्थित होते.
Mla
                       जाहिरात 👆
या बैठकीमध्ये जिजाऊ माँसाहेब जन्मभूमी विकास आराखड्याचे सुधारित अंदाजपत्रक सादर करण्यात यावे तसेच पुरातत्वविभागाकडून मान्यता मिळण्यात यावी या बाबतची मागणी आ. डॉ. शिंगणे यांनी केली. याबाबत विस्तृत चर्चा करून सुधारित अंदाजपत्रक सादर करण्याचे आदेश ना. अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. लोणार सरोवराच्या विकासासाठी देखील आवश्यक ती कारवाई करू असा शब्द यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला..