मनोज जरांगेंचा रविकांत तुपकरांना फोन! म्हणाले, आम्ही तुमच्यासोबत; सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दिला पाठिंबा; पहा व्हिडिओ....
Nov 28, 2023, 14:00 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर मुंबईत मंत्रालयाचा ताबा घेण्यासाठी रवाना झालेले आहेत. जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो शेतकरी रविकांत तुपकर यांच्या समवेत मुंबईला निघालेले आहेत. ठरल्याप्रमाणे उद्या २९ नोव्हेंबरला मंत्रालयाचा ताबा घेण्याचा रविकांत तुपकर यांचा इरादा आहे. दरम्यान तुपकर यांच्या आंदोलनाला विविध स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आज मराठा आरक्षणाच्या आंदोनाचे प्रणेते मनोज जरांगे पाटील यांनी तुपकर यांना फोन करून पाठिंबा दर्शविला.
"सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढताय ही चांगली गोष्ट आहे. आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. तब्येतीची काळजी घ्या" असे मनोज जरांगे पाटील तुपकरांना म्हणाले. जरांगे पाटील यांनी तुपकरांच्या तब्येतीच्या बाबतीत देखील विचारपूस केली. यावेळी तुपकर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्हीदेखील सोबत असल्याचे जरांगेंना सांगितले.