राजर्षी शाहू मल्टीस्टेट चे अध्यक्षा मालतीताई शेळके यांना बेस्ट चेअरमन पुरस्कार! महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनने केला गौरव..!

 
मालती शेळके
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'सक्षम महिला सक्षम सहकार ' अंतर्गत महिला प्रशिक्षण व कार्यशाळा पुरस्कार सोहळा आज सोमवार,११ मार्च रोजी आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे येथे पार पडला. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन द्वारा या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी "बेस्ट चेअरमन" या पुरस्काराने राजश्री शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ.मालती संदीप शेळके यांना गौरविण्यात आले. 
Add
                       Add.👆
याप्रसंगी राज्यभरातील सहकारी संस्थांच्या महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. अंजली उन्नती फाउंडेशनच्या गौरीताई बेनके तसेच अनुसया महिला पतसंस्थेच्या संस्थापक किरण दिलीपराव वळसे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. सहकार क्षेत्रातील कार्यरत महिला प्रतिनिधींचा सन्मान तसेच उत्साह वाढवण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहकार क्षेत्रात कार्य करणाऱ्या राज्यभरातील असंख्य महिला उपस्थित होत्या. पुरस्कार स्वीकारल्या नंतर शाहू मल्टीस्टेटच्या सगळ्या सदस्यांचा हा सन्मान असल्याचे प्रतिपादन सौ मालती शेळके यांनी केले.