महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचा वचननामा जाहीर! शेतकऱ्यांना ठेवले केंद्रस्थानी; नदीजोड व दोन्ही रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेण्याची घेतली गॅरंटी! महिलांसाठी "लखपती दिदी" योजनेवर देणार भर...

 
बुलडाणा
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुढच्या ५ वर्षाव जिल्ह्याला एक विकसीत जिल्हा म्हणून समोर आणण्याच्या दृष्टीने महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी संकल्प करत आपला वचननामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मांडला आहे. बुलडाणा अर्बन रेसिडेन्सी येथे हा कार्यक्रम पार पडला. यावेळी महायुतीचे आमदार राजेंद्र शिंगणे, आ.संजय कुटे,आ. संजय रायमूलकर, आ. आकाश फुंडकर, आ. संजय गायकवाड, आ. श्वेताताई पाटील, माजी आमदार तोताराम कायंदे, चैनसुख संचेती, विजयराज शिंदे, शशिकांत खेडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. जाहीरनाम्यात शेतकरी केंद्रबिंदू मानून सिंचनाच्या सुविधा देण्यासोबतच दळणवळणाच्या दृष्टीने खामगाव-जालना आणि अकोला-खंडवा व्हाया संग्रामपूर-जळगाव जामोदमार्गे पूर्णत्वास नेण्याचा संकल्प केला आहे. यासह आरोग्य, दुरसंचार, महिला सक्षमीकरणासह शैक्षणिक विकासाच्या मुद्द्याला यात प्राधान्य देण्यात आले आहे.प्रत्यक्ष कृृतीशील रहात वचननाम्यातील उदिष्ठपूर्तीवर त्यांनी भर दिला आहे. 
दळणवळणाच्या पायाभूत विकासावर भर 
महायुतीच्या या जाहीरनाम्यात बुलढाणा जिल्ह्याशी निगडीत खामगाव-जालना, अकोट-खंडवा रेल्वेमार्ग आगामी पाच वर्षाच्या काळात पूर्णत्वास नेण्याचे वचन दिले गेले आहे. गेल्या १५ वर्षात या रेल्वेमार्गासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा त्यांनी केला. ५ हजार ५०० कोटी रुपयांच्या खामगाव-जालना रेल्वे मार्गसाठी राज्य शासनाचा ५० टक्के हिस्सा मिळण्याचा निर्णयही मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब करून घेतले. २ हजार ४५६ कोटी रुपयांचा हिस्सा देत राज्य शासनाने आपला वाटा उचलला. त्यामुळे आता या रेल्वेमार्गाच्या पूर्णत्वाची हमी खा.प्रतापराव जाधव यांनी घेतली आहे. आचारसंहिता संपताच याचे काम मार्गी लागणार आहे. अकाेट-खंडवा रेल्वे मार्ग संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यातून जात असून हा मार्ग आकारास येत आहे. केंद्राने १३५६ कोटी रुपये निधी दिला आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमीन अधिग्रहणचे कामही अंतिम टप्प्यात आहे. या मार्गामुळे खामगाव, शेगाव, जळगाव जामाेद, संग्रामपूर, माेताळा मलकापूर, नांदुरा हे तालुके दक्षीण मध्यरेल्वे व मध्य रेल्वेला जाेडले जाणार आहेत. सोनाळा आणि जामोद येथे दोन मोठे रेल्वेस्टेशन रहातील असे जाहीरनाम्यात म्हटले आहे.
Advt
सिंचन हा कळीचा मुद्दा
 बुलढाणा जिल्ह्यासाठी सिंचन हा कळीचा मुद्दा आहे. त्यानुषंगने जिगाव पाठोपाठ आता वैनगंगा, नळगंगा-पैनगंगा आणि खडकपूर्णा नदीजोड प्रकल्प युद्धस्तरावर मंजूर करण्यास प्राधान्य दिले आहे. ८८ हजार कोटींच्या या प्रकल्पाचा डीपीआर बनविण्यासाठी २ हजार कोटी रुपये मंजूरही करण्यात आले आहेत. हा प्रकल्प पुर्णत्वास गेल्यास ३१ टक्के महत्तम सिंचन क्षमता दुपटीने वाढून ७० टक्क्यांच्या आसपास जाईल.
आस्था आणि श्रद्धास्थानांच्या विकासाला प्राधान्य
याव्यतिरिक्त सिंदखेड राजा, लोणार, संत चोखामेळा ही स्थाने जिल्ह्यातील नागरिकांची आस्था, श्रद्धास्थाने आहेत. त्याच्या पायाभूत विकासासाठी प्राधान्याने प्रयत्न करून ते पुर्णत्वास नेण्याचे वचनही या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त जिल्ह्यात मेगाफुड पार्क, सोयाबीन, कापूस, संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणी आणि युवकांसाठीच्या नवीन रोजगार व कौशल्यावर आधारीत उद्योग निर्मितीवर भर देण्याचे वचनही देण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणासाठी बचत गटाच्या माध्यमातून उपजिविका विक्री व सामुहिक सुविधा केंद्रांच्या कामांना गती देण्याचा, प्रत्येक गावात बचत गट भवन बांधून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र माेदी यांच्या संकल्पनेनुसार मतदारसंघात व जिल्ह्यात माेठ्यासंख्येने 'लखपती दिदी' याेजना राबविण्यावर भर देण्याचेही जाहीरनाम्यात स्पष्ट केले आहे.