महाराष्ट्राचा शाहीरीबाणा’ अंगावर उभे करुन गेला रोमांच! शेलसूर नगरीत अनोखा सोहळा; आमदार श्वेताताई म्हणाल्या, मातृसन्मान हा वात्सल्याने अभिप्रेत बहुमान!

 

बुलडाणा( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): मातेची महती ही न्यारीच आहे. यामुळे कर्मकांडाला फाटा देवून स्व.आईच्या पहिल्या स्मृतीदिनी ‘मातृसन्मान गौरव’ कर्तृत्ववान व्यक्तीमत्वाचा हा वात्सल्याने अभिप्रेत असलेला बहुमान असल्याचे आ. सौ.श्वेताताई महाले पाटील यांनी सांगून पुरस्कारप्राप्त सर्वांसाठी ही मायेची उब असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी शाहीर विक्रांतसिंह सज्जनसिंह राजपूत यांचा ‘महाराष्ट्राचा शाहीरीबाणा’ हा कार्यक्रम अंगावर रोमांच उभा करुन गेला!

शेलसूर येथे सोमवार २७ मार्च रोजी कै.गुंफाताई जगन्नाथ काळे स्मृतिप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात आ. श्वेताताई महाले पाटील बोलत होत्या. समाजातील काही कर्तृत्ववान सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स, पत्रकार, साहित्यिक, शाहीर, गायक व निवेदकांचा ‘मातृगौरव पुरस्कार’ देवून यावेळी सत्कार करण्यात आला. यात सार्वजनिक जयंती सोहळ्याचे एकीकरण ज्यांच्या माध्यमातून झाले ते सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुनिल सपकाळ, व्हॉईस आफ मिडीया प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अनिल म्हस्के, मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिवपदी निवड झाल्याबद्दल अमर राऊत, शाहीरी क्षेत्रात गौरवपुर्ण कामगिरी करुन अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणारे शाहीर डी. आर.इंगळे, अ.भा.ग्रामीण पत्रकार संघात जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले प्रताप मोरे, विविध सामाजिक- सांस्कृतिक कार्यक्रमात निवेदनाची भूमिका बजावणारे   चंद्रशेखर जोशी यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या डॉ.सौ.स्मिताताई योगेश गोडे, ‘बेस्ट चेअरमन अ‍ॅवार्ड’ पुरस्काराने सन्मानित सौ. मालतीताई संदीप शेळके, अमरावती विद्यापीठ सिनेट सदस्यपदी नियुक्त झालेल्या प्रा.डॉ.मिनल निलेश गावंडे व विविध पुरस्काराने सन्मानित डॉ.गायत्री सावजी, संगीत विषारद गायिका कु.वैष्णवी विजय रिंढे तथा सैलानी येथील मनोरुग्णांसाठी काम करणाऱ्या व राष्ट्रीय उपाध्यक्षा एआयपीसी निवड झालेल्या डॉ.कु.गार्गी हर्षवर्धन सपकाळ, आरोग्य विद्यापीठाच्या सिनेटपदी निवड झालेल्या डॉ.सौ.स्वाती राजेश्वर उबरहंडे तसेच प्रा.सौ.अंजली परांजपे यांचा यावेळी ‘मातृसन्मान’ देत गौरव करण्यात आला.

हा सन्मान आ.श्वेताताई महाले, रविकांत तुपकर, बारोमासकार प्रा.डॉ.सदानंद देशमुख, ‘सेवासंकल्प’चे  डॉ.आरती व डॉ.नंदकुमार पालवे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी बहारदार संचलन तथा पुरस्कार प्राप्त  व्यक्तीमत्वाची यशोगाथा अजीम नवाज राही यांनी सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार राजेंद्र काळे यांच्यावतीने शेलसूर येथे करण्यात आले होते. यावेळी सिध्देश्वर पवार, रविंद्र साळवे, कुणाल पैठणकर, शैलेश खेडेकर, राजेश टापरे, कृष्णा हावरे, रविंद्र काळे, प्रभाकर काळे, भास्कर काळे, डिगांबर काळे उपस्थित होते.

या कार्यक्रमात शाहीर विक्रांतसिंह राजपूत यांनी छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्यासह महापुरुषांची संदर्भ देत ‘महाराष्ट्राचा शाहीरीबाणा’ सादर केला. यावेळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.