केंद्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राची बोळवण; शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बुलडाण्यात केली निदर्शने...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. देशांमध्ये भारताच्या एकूण कर संकलनेत महाराष्ट्र राज्याचा १९.६% इतका वाटा असून देशात अव्वल स्थानी आहे. असे असताना केंद्र सरकारला टेकू देणारे राज्य बिहारला साठ हजार कोटी व आंध्र प्रदेशला पंधरा हजार कोटी एवढा भरून निधी देण्यात आला असून महाराष्ट्राला मात्र ७५४५ हजार कोटी एवढ्यावरच बोळवण करण्यात आली आहे. केंद्राची महाराष्ट्रप्रति सापत्न वागणूक दिसून येत आहे असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नरेश शेळके यांनी केला. काल, २४ जुलै रोजी बुलढाणा येथे केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करताना व्यक्त करतांना ते बोलत होते.
 अर्थसंकल्पात केंद्र शासनाने महाराष्ट्र प्रति केलेल्या सापत्न वागणुकीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने बुलढाणा येथे संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर नरेश शेळके यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी आंदोलन करताना केंद्र शासनाच्या विरोधात नारे देऊन निषेध व्यक्त केला. यावेळी बीटी जाधव जिल्हा महासचिव, पी एम जाधव जिल्हा उपाध्यक्ष, तुळशीराम दादा काळे तालुका अध्यक्ष, अनिल बावस्कर शहराध्यक्ष, राजू गवळी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष, ह भ प शंकर महाराज अध्यक्ष वृद्ध कलावंत मानधन समिती, गणपत कुसळकर, गणेश कोरके, सत्तर कुरेशी कुरेशी, संजय शिरसाट, सुजित देशमुख, विनोद गवई, सय्यद इकबाल, अतिश बिडकर , संतोष पवार, अनिल माळी, संदीप बोर्डे, रमेश काळे, सुरेश राजपूत, सावजी जाधव, प्रकाश शेळके, बाळासाहेब भराड, पंजाबराव राऊत, मधुकर काळवाघे, ज्ञानेश्वर शेळके यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.