चिखलीत महाविकास आघाडीचे रास्तारोको पण नेत्यांना पोलीसांनी लगेच केले स्थानबद्ध! शासन आपल्या दारीसाठी १२ बसेस पोलीस संरक्षणात रवाना...

 
Bdbxb
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने आज रास्तारोको आंदोलन करण्यात येत आहे. जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा निषेध महाविकास आघाडी करीत आहे. त्यातच शासन आपल्या दारी हा कार्यक्रम देखील आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बुलडाण्यात होत आहे. ठरल्याप्रमाणे चिखलीत खामगाव चौफुलीवर महाविकास आघाडीच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
मेहकर वरून बुलडाण्याकडे जात असलेल्या बसेस आंदोलकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही मिनिटांत पोलिसांनी महाविकास आघाडीचे आंदोलन मोडून काढले. काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले असून १२ बसेस पोलीस संरक्षणात बुलडाण्याकडे रवाना केल्या आहेत.