मेहकरात पुन्हा माधव"राज"! खासदार प्रतापराव जाधवांच्या भावाचीच सभापती म्हणून वर्णी ​​​​​​​

 
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीची यंदाची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. ३० वर्षापासून इथे खा.प्रतापराव जाधव म्हणतील तेच असे समीकरण होते. यंदा मात्र महाविकास आघाडीने तगडे आव्हान उभे केले होते. मात्र अखेरच्या क्षणी ११ विरुद्ध ७ असा सामना खासदार जाधवांच्या भूमिपुत्र पॅनलने जिंकला. काल,१८ मे रोजी झालेल्या सभापती - उपसभापती पदाच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे  पुन्हा एकदा खासदार  प्रतापराव जाधव यांचे बंधू माधवराव जाधव यानांच  सभापती बनविण्यात आले. तर उपसभापती पदी विलास मोहरूत यांची वर्णी लावण्यात आली.
 

 माधवराव जाधव यांनी याधीही सभापती म्हणून काम सांभाळले आहे. त्यामुळे माधवराव जाधव पुन्हा सभापती होतील हे ठरलेले, त्यामुळे  उत्सुकता केवळ उपसभापती कोण होईल याची होती. त्यात विलास मोहरूत यांची वर्णी लागली. महाविकास आघाडीकडून विलास बचाटे यांनी सभापती पदासाठी तर स्वप्नील गाभने यांनी उपसभापती पदासाठी अर्ज केला होता, दोघांचा पराभव झाला.