लोणार बाजार समितीच्या निवडणुकीत काटे की टक्कर! महाविकास आघाडीला ३ तर शिवसेनेला ४ जागा..

 
nhhb
लोणार( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही अटीतटीची लढत झाली होती. आता लोणारच्या निवडणुकीत सुद्धा तसेच होतांना दिसत आहे.
 

पहिल्या ३ जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्यानंतर दुसरा निकाल हाती आला तेव्हा खासदार प्रतापराव जाधवांच्या मार्गदर्शनाखालील पॅनल ने ४ जागा पटकावल्या. चारही जागा ग्रामपंचायत मतदारसंघातील आहेत. अजून ११ जागांचे निकाल हाती येणे बाकी आहे, त्यामुळे इथे काट्याची टक्कर होतांना दिसत आहे.