लोकसभा समन्वयक राहुल चव्हाणांनी घेतली बुलडाणा तालुका शिवसेनेची बैठक! म्हणाले, जालिंधर बुधवतांची भूमिका जामुवंतांची;

लोकसभेवर भगवा फडकवण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन; गद्दार आमदारांनाही धडा शिकवा म्हणाले..
 
Gcjkf
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हनुमंताला जेव्हा स्वतःच्या शक्तीचे विस्मरण झाले तेव्हा जामुवंतांनी हनुमंतरायांना त्यांच्या शक्तीचे स्मरण करून दिले होते. त्यामुळेच हनुमंत समुद्रावरून उड्डाण करून लंकेत जाऊ शकले. बुलडाणा जिल्ह्यातील गावागावात शिवसेनेची प्रचंड ताकद आहे, हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गद्दार गेले म्हणून आपली ताकद कमी झाली नाही तर ती आता दहापटीने वाढली आहे. जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवतांनी जिल्हा शिवसेनेला आपल्या शक्तीचे विस्मरण होऊ दिले नाही, उलट शक्तीचे स्मरण करून देत शिवसैनिकांची ताकद वाढवली आहे,त्यामुळे जालिंधर बुधवंत यांची भूमिका ही जामुवंताची आहे असे प्रतिपादन शिवसेना उबाठा चे लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण यांनी केले. बुलडाण्यातील जन शिक्षण संस्थेच्या कार्यालयात बुलडाणा तालुक्यातील बूथप्रमुख शाखाप्रमुखांची बैठक पार पडली, या बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत महिला आघाडी जिल्हा संघटिका चंदाताई बढे, उपजिल्हा प्रमुख सुनील घाटे,तालुका प्रमुख लखन गाडेकर, विधानसभा संघटक अशोक इंगळे, दादाराव महाले, युवासेना उपजिल्हा प्रमुख डॉ.अरुण पोफळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शाखाप्रमुख, बुथप्रमुख उपस्थित होते.
  पुढे बोलतांना राहुल चव्हाण म्हणाले की, हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सामान्य शिवसैनिकांना सत्तेची पदे दिली. मात्र काहींनी गद्दारी केली. बुलडाणा लोकसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि राहील. गद्दार खासदारांना आणि गद्दार आमदारांना गाडण्यासाठी शिवसैनिकांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर आणि जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनीही बैठकीला संबोधित केले. यावेळी चव्हाण यांनी संघटनात्मक कामकाजाचा आढावाही घेतला.