सोनाळ्याचा संत्रा जागतिक बाजारपेठेत पोहचवू ! संदीप शेळकेंचे सोनाळ्यात प्रतिपादन; संत सोनाजी महाराजांच्या भूमीत वन बुलडाणा मिशनचा विकासाचा गजर

 
Hxbcn
संग्रामपूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोनाळा परिसर हा संत्रा बेल्ट आहे. मात्र दुर्दैवाची बाब म्हणजे याठिकाणी संत्रा प्रोसेसिंग युनिट नाही. लोकप्रतिनिधींना या भागात एखादा प्रकल्प उभारता आला नाही. संत सोनाजी महाराजांच्या नावाने संत्र्याचा ब्रँड विकसित करून इथला संत्रा जागतिक बाजारपेठेत पोहचवू, अशी ग्वाही राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी दिली. 
Hdnccn
                  जाहिरात 👆
मंगळवारी (१२ डिसेंबर) रोजी संत सोनाजी महाराजांच्या सोनाळा या पवित्र भूमीत संवाद मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी जनतेशी हितगुज साधले. पंचक्रोशीतील नागरिकांचा सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्याकडे प्रबळ इच्छाशक्तीचा अभाव आहे. अन्यथा पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे आपलाही विकास झाला असता. जनतेने या गोष्टीकडे चिकित्सक दृष्टीने पाहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. 
विकास हाच एकमेव ध्यास
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन गेल्या आठ महिन्यांपासून गावोगावी वन बुलढाणा मिशनच्या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून विचारांची पेरणी करतोय.आपली भूमिका ठाम आहे. येणाऱ्या काळात जिल्हा विकासात अव्वलस्थानी आणायचाय. सिंचन, रोजगार, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण यासह सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी प्रयत्न करायचे असल्याची भूमिका संदीप शेळके यांनी व्यक्त केली. 
जिल्ह्याचे आदर्श मॉडेल उभे करू ..
जिल्हा अनेक दृष्टीने समृध्द आहे. परंतु. उपलब्ध साधनांचा उपयोग करून जिल्ह्यात मोठे प्रकल्प उभे करणे गरजेचे आहे.खरं तर इतक्या वर्षांतच हे व्हायला पाहिजे होते. परंतु लोकप्रनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. वन बुलडाणा मिशनच्या माध्यमातून आपल्याला विकसित, समृद्ध, हेवा वाटावा असे जिल्ह्याचे आदर्श मॉडेल सर्वांसमोर ठेवायचे आहे, असा आशावाद संदीप शेळके यांनी व्यक्त केला.