नेत्यांनो यंदा बंबाट करा खर्च! लोकसभेसाठी ९५ लाखापर्यंत करता येणार खर्च,पण द्यावा लागणार हिशोब, नाही तर होईल पंचाईत....

 
Krch
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शक आणि निर्भय वातावरणात पार पाडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक सूचना आणि आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात उमेदवार, राजकीय पक्ष यांचाकडून होणाऱ्या निवडणूक खर्चावर संनियंत्रण, परिक्षण करण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील दिली.
भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी प्रति उमेदवार ९५ लाख रुपये कमाल खर्चाची मर्यादा निश्चित केली आहे. निवडणुकीदरम्यान सदर खर्च मर्यादेचे पालन होण्यासाठी उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल केल्याच्या दिनांकापासून विहित नमुन्यात दैनंदिन निवडणूक खर्चाशी संबंधित समन्वय अधिकारी यांच्याकड़े सादर करावा लागणार आहे, निवडणूक कार्यक्रमादरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय प्रत्येकी स्थायी निगरानी पथक, भरारी पथक, चलचित्र निगराणी पथके, तैनात करण्यात आली आहे. सदर पथके राजकीय सभा, रॅली यासारख्या प्रत्येक कार्यक्रमावर सूक्ष्म नजर ठेवणार आहे. तसेच प्रत्येक बाबीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे. सदर पथकातील कर्मचाऱ्यांचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. तसेच त्यांचे प्रशिक्षणही घेण्यात आले आहे. सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय दैनदिन खर्चाकरिता नेमलेल्या समन्वय अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्यात येणार आहेत. तसेच निवडणूक खर्चाबाबत प्राप्त होणाच्या तक्रारींची पडताळणी करण्यात येणार आहे.
कागदावर लाख, प्रत्यक्षात कोटींची उलाढाल? 
निवडणूक आयोगाने ९५ लाखांच्या खर्चाची मर्यादा दिली असली तरी मात्र प्रत्यक्षात कोटींची उलाढाल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.