जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी कैलास भालेकर! खा.प्रतापराव जाधव यांनी केली होती शिफारस.

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चिखली येथील कैलास मुरलीधर भालेकर यांची आज मंगळवार,१२ मार्च रोजी जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 कैलास भालेकर चिखलीतील प्रसिद्ध व्यापारी असून सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच समाजकार्यातील त्यांचे योगदान पाहता व खा.प्रतापराव जाधव यांच्या शिफारसी ने त्यांची निवड करण्यात आली आहे.