उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खा.प्रतापराव जाधवांची पहिली प्रतिक्रिया; महायुतीच्या नेत्यांचे मानले आभार! आमदार गायकवाड माघार घेतील म्हणाले....

 
Fgh

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मोठ्या प्रतीक्षेनंतर अखेर आज शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेने आपल्या ८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा खासदार प्रतापराव जाधव यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान खा.प्रतापराव जाधव यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो असे खा.जाधव म्हणाले.

ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे. १५ वर्षात जी कामे केली त्याच्या आधारावर लोकांसमोर जाणार असल्याचे ते म्हणाले. आमदार संजय गायकवाड यांनी उमेदवारी दाखल केली त्याबद्दल छेडले असता " आमदार संजय गायकवाड यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते कट्टर शिवसैनिक आहेत. ते पक्षाच्या विरोधात काम करणार नाही, निश्चितच ते त्यांची उमेदवारी मागे घेतील असे खा.जाधव म्हणाले.

आ. गायकवाड म्हणाले...

दरम्यान यासंदर्भात बुलडाणा लाइव्ह ने आमदार संजय गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, यावर उद्या सकाळी सांगतो असे आ.गायकवाड म्हणाले...