Amazon Ad

खा.प्रतापराव जाधवांचा सिंदखेडराजा तालुक्यात झंझावाती प्रचार दौरा! खा.जाधव म्हणाले, मतदारराजा हुशार; आपल्याला कामाची पावती मिळेल...

 
सिंदखेडराजा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): विरोधकांना जे बोलायचे ते बोलुद्या, राजकारण भावनेच्या आहारी जाऊन नये तर प्रॅक्टिकल होऊन करायचे असते. २०१४ पूर्वीचा जिल्हा आणि आताचा बुलडाणा जिल्हा याची तुलना करून बघितली तर जिल्हा विकासाच्या बाबतीत किती पुढे गेला हे लक्षात येईल. जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणल्या गेले, त्या रस्त्यांचा दर्जा उत्तम आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात निश्चितच उद्योगधंद्यांची संख्या वाढेल. सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी पैनगंगा - नळगंगा - वैनगंगा या ८८ हजार कोटी रुपयांच्या नदीजोड प्रकल्पाला केंद्र सरकारने मंजुरात दिली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रापैकी ७० टक्के जमीन ही सिंचनाखाली येणार आहे. मतदारराजा हुशार आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आपल्याला आपल्या कामाची पावती नक्कीच मिळेल असे प्रतिपादन खा.प्रतापराव जाधव यांनी केले. सिंदखेडराजा तालुक्यातील विविध गावांत खा. जाधवांनी झंझावाती प्रचार दौरा केला यावेळी आयोजित गावकऱ्यांच्या बैठकांत खा.जाधव बोलत होते.
Jadhv
  खा. प्रतापराव जाधव यांनी २ एप्रिलला महायुतीचे उमेदवार म्हणून नामांकन अर्ज दाखल केला. त्यानंतर आता खा.जाधव यांनी प्रचाराची धडाकेबाज सुरूवात केली आहे. खा.जाधव यांच्या सिंदखेडराजा तालुक्यातील जनसंवाद दौऱ्याला धडाकेबाज प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. गावोगावी होणाऱ्या सभांमधून खा.जाधव मतदारांशी संवाद साधत आहेत. सिंदखेडराजा तालुक्यातील धानोरा, बट्टा तांडा, बोराखेडी गंडे, चांगेफळ, देवखेड, राहेरी,सोनोशी, वर्दडी, निमखेड या गावांत खा.जाधव यांनी मतदारांशी संवाद साधला. गावागावात खा.जाधव यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. माजी आ. तोताराम कायंदे, शशिकांत खेडेकर,भाजप जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे, भाजपा प्रवक्ते विनोद वाघ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते या दौऱ्यात सहभागी झाले होते.
Jadhav
  मोदींचे हात बळकट करा..
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचा कायापालट केला. कोट्यावधी भारतीयांचे स्वप्न असलेले श्री राम मंदिर, कलम ३७० यासारख्या अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या काळात झाल्या. काँग्रेसचे सरकार देशात असते ते स्वप्न हे स्वप्नच राहिले असते. शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी केंद्राची पीएम किसान, राज्याने शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आहे. भारताचा गौरव सातासमुद्रापार पोहचला आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता हीच विरोधकांची पोटदुखी आहे. भारताला सर्वोच्च स्थानी पोहचण्यासाठी पंतप्रधान मोदींचे हात बळकट करा आणि बुलडाण्यात महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांना पुन्हा एकदा संसदेत पाठवा असे आवाहन यावेळी माजी आ.तोताराम कायंदे यांनी केले.
Bcgj