Amazon Ad

खा.प्रतापराव जाधवांच्या प्रचार दौऱ्याला मेहकर तालुक्यात दणकेबाज प्रतिसाद! खा.जाधव म्हणाले, कामाची पावती मिळणार; ४ जूनला गुलाल उधळू

 
मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गेल्या १० वर्षात हजारो कोटींची कामे मतदार संघात केली आहेत. मतदारसंघातील एकही गाव असे नाही जिथे विकासकामे झाली नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची वाटचाल नंबर १ कडे सुरू आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या कामाची पावती नक्कीच मिळेल आणि ४ जूनला आपण विजयाचा गुलाल उधळू असे प्रतिपादन खा.प्रतापराव जाधव यांनी केले. ११ एप्रिलला खा प्रतापराव जाधव यांचा प्रचार दौरा मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकर्शा, घाटबोरी या गावात संपन्न झाला यावेळी खा.जाधव मतदारांशी संवाद साधतांना बोलत होते.
महायुतीचे उमेदवार खा. प्रतापराव जाधव यांच्या मेहकर तालुक्यातील प्रचार दौऱ्याला दणकेबाज प्रतिसाद मिळाला. गावागावात खा. प्रतापराव जाधव यांचे जंगी स्वागत झाले. खा. जाधव यांना चौथ्यांदा संसदेत पाठवण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला भिडले आहेत. ११ एप्रिलला देऊळगाव साकर्शा आणि घाटबोरी या गावांत खा.जाधव यांनी मतदारांशी संवाद साधला. जनतेचे प्रेम कधीही विसरणार नाही, जनतेच्या प्रेमामुळेच आपल्याला ३ वेळा संसदेत जाता आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशहितासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे आपण भागीदार असल्याचा अभिमान असल्याचे यावेळी खा.जाधव म्हणाले. यावेळी आ.संजय रायमुलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गाडेकर,राष्ट्रवादीचे नेते गिरीधर ठाकरे, मनसे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण जाधव,शिवसेना ता. प्रमुख सुरेश वाळुकर,महिला आघाडी च्या आशाताई झोरे, भाजपचे तालुकाध्यक्ष सांरग माळेकर,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष गजानन सांवत,युवक राष्ट्रवादीचे राहुल देशमुख,सागर पाटील युवासेनेचे भूषण घोडे व महायुती चे प्रमुख पदाधिकारी व तसेच महायुती मधील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.