उद्या होणार वरवट बकाल येथे खा.प्रतापराव जाधव यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन !
Apr 11, 2024, 18:19 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई,पिरीपा, रयत क्रांती व रासप महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार प्रतापराव जाधव यांच्या संग्रामपूर तालुक्यातील वरवट बकाल येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या, १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि महायुतीतील मित्र पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातून १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई गट, कवाडे गट, रयत क्रांती रासप मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन आयोजित करण्यात आले आहे. प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजय कुटे यांच्या हस्ते केले जाणार आहे. या कार्यक्रमात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, पिरीपा, रयत क्रांती संघटना, मनसे, रासप, मित्रपक्षाच्या पदाधिकारी महिला आघाडी, शहर प्रमुख, उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख बुथ प्रमुख, शाखा प्रमुख, शिवदूत यांनी उपस्थित रहावे असे आवाहन संग्रामपूरचे शिवसेना तालुका प्रमुख केशव पाटील ढोकणे यांनी केले आहे.