कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील विजयाचा बुलडाण्यात जल्लोष
Mar 2, 2023, 21:03 IST
बलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. २८ वर्षांपासूनचा भाजपचा गड आजच्या निवडणूक निकालाने कोसळला. या विजयाबद्दल बद्दल बुलडाणा शहरात महविकास आघाडीच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी दत्ता काकस, अनिल बावस्कर, जाकीर कुरेशी, सत्तार कुरेशी, याकूब खा पठाण, अनिल वारे, योगेश परसे, सुरेश सरकटे, राजेश गवई, सागर घटते, शेख मुजाहिद, किरण खिल्लारे, अश्विन वैद्य, सागर गट्टे, विनोद गवई, सुधीर पनपालिया, प्रताप खरात व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.