जयश्रीताई शेळकेंची सावळा येथील वृद्धाश्रमाला भेट! गणरायाची आरती केली ; ज्येष्ठ नागरिकांची केली विचारपूस

 
drfhj

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव ॲड. जयश्रीताई शेळके यांनी २८ सप्टेंबर रोजी सावळा येथील श्री. समर्थ वृध्दाश्रमाला भेट दिली. गणरायाची आरती करुन त्यांनी अभिवादन केले. तसेच वृद्धाश्रमातील लाभार्थ्यांची विचारपूस केली. 

धुळे येथील जोगेश्वरी ग्रामिण विकास सेवाभावी संस्थेच्यावतीने सावळा येथे सहा महिन्यांपूर्वी वृद्धाश्रम सुरू  करण्यात आला आहे. याठिकाणी ३० लाभार्थी आहेत. यामध्ये १८ पुरुष आणि १२ महिलांचा समावेश आहे. त्यांचे वय ६५ वर्षांवरील आहे. वृद्धाश्रमाकडून लाभार्थ्यांना सकाळचा नास्ता आणि दोन वेळच्या जेवणाची सुविधा उपलब्ध केली जाते. आठवड्यातून त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येते. त्यांना योगाची धडे दिली जातात. त्यांच्याकरिता विरंगुळ्याची साधने ठेवण्यात आली आहेत. ज्येष्ठ नागरिक इथे आनंदाने राहतात. 

संस्थाध्यक्ष योगेश पाटील हे मूळचे धुळे येथील आहेत. त्यांनी जोगेश्वरी ग्रामीण विकास सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. जिल्ह्यातील खामगाव येथून त्यांनी पॉलिटेक्निकचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे जिल्ह्याशी त्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत. समाजात वृद्ध, ज्येष्ठ नागरिकांकडे दुर्लक्ष होते. म्हातारपणी त्यांचा सांभाळ केला जात नाही. ही परिस्थिती पाहुन मन हेलावल्याने उच्च पगाराची नोकरी करण्यापेक्षा समाजसेवा करण्याला योगेश पाटील यांनी प्राधान्य दिले आहे. त्यांच्या समाजसेवेच्या निर्णयाचे जयश्रीताई शेळके यांनी कौतुक केले. 

यावेळी पोलीस पाटील संजय तुपकर, काशिनाथ तुपकर, सीताराम जगताप, अरुण जगताप, अधीक्षक गणेश वानखेडे, रघुनाथ राठोड, तृप्ती काटेकर, मोहन बंगाळे, डॉ. कविता बंगाळे, यश वानखेडे, पूजा चंदेल, अनिल पाटील, संजय शिंदे, राहुल चांदवडे, मनोहर चव्हाण, जितेंद्र चौधरी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.