जमल भो.! येणार येणार..अनेक दिवसांपासून गायब असलेले पालकमंत्री दिलीप वळसे पाटील उद्या जिल्ह्यात येणार...

 
बुलडाणा(राहुल रिंढे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? असा प्रश्न विचारला तर अनेकांना त्याचे उत्तर देता येणार नाही..अर्थात यात उत्तर न देता येणाऱ्याचा दोष नाही तर याला स्वतः पालकमंत्री जबाबदार आहे. कारण एवढी मोठी जबाबदारी असून त्यांचं जिल्ह्याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे.ते मुंबईत अन् त्यांच्या मतदारसंघातच व्यस्त होते..आता अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर पालकमंत्री दिलीप वळसे पाटील उद्या जिल्ह्यात येणार आहेत .
Advt
Advt.👆
श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, शनिवार, दि. २७ जुलै रोजी सकाळी ५.४० वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथे आगमन होईल. सकाळी ७.३०वाजेपर्यंत शासकीय विश्राम भवन येथे आगमन व राखीव राहणार असून त्यानंतर शासकीय विश्राम भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात जिल्हा नियोजन समिती व डोंगरी विकास आढावा बैठकीला उपस्थित राहतील. दुपारी १ वाजता मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची आढावा बैठक घेतील. दुपारी १.३० वाजता जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची आढावा बैठक घेतील. दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत राखीव राहणार आहे. दुपारी ३ वाजता अभ्यागतांच्या भेटीसाठी राखीव राहील. त्यानंतर सोईनुसार बुलडाणा येथून शेगाव रेल्वे स्टेशनकडे प्रयाण करतील. रात्री ९ वाजता शेगाव रेल्वे स्टेशन येथून अमरावती-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण करतील.