जमल! काट्याची टक्कर पण खासदार जाधवांनी बाजी मारली? मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीवर भगवा; ११ जागा पारड्यात पडल्याचा दावा! माधवराव जाधवांचा पराभव झाल्याची अफवा ​​​​​​​

 
jadhao
मेहकर( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगतदार ठरत महाविकास आघाडीच्या काही नेत्यांनी आधीच जल्लोष साजरा केला, मात्र तो चांगलाच अंगलट आला. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा खासदार प्रतापराव जाधवांच्या मार्गदर्शनखाली भूमिपुत्र पॅनल ने बाजी मारली. १८ पैकी ११ जागांवर भूमिपुत्र ने बाजी मारल्याचा दावा करण्यात येत असून उर्वरित जागा महाविकास आघाडीच्या पारड्यात पडल्याचे समजते.
 

jdh

खासदार प्रतापराव जाधवांचे बंधू तथा माजी सभापती माधवराव जाधव यांचा पराभव झाल्याचे वृत्त याआधी बुलडाणा लाइव्ह ने सुत्रांच्या हवाल्याने दिले होते. मात्र सुत्रांनी दिलेली माहिती चुकीचे असल्याचे समोर आले असून पुन्हा एकदा माधवराव जाधव यांनी आपली पकड मजबूत असल्याचे सिद्ध करीत दणदणीत विजय मिळवला असे भूमिपुत्र पॅनल च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. माधवराव जाधवांच्या पराभवाचे वृत्त चुकीने छापल्या गेले त्याबद्दल टीम बुलडाणा लाइव्ह दिलगिरी व्यक्त करीत आहे.

महत्वाची सूचना: अंतिम निकाल अद्याप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर केलेला नाही. काही वेळानंतर चित्र स्पष्ट होईल..!