भाषणबाजी नव्हे थेट कामाला हात! संदीप शेळकेंचा स्वातंत्र्यदिन लासुऱ्यात! "वन बुलडाणा मिशन" च्या माध्यमातून भिकाबाईंना मिळवून दिले हक्काचे छत; भिकाबाई म्हणाल्या, माझा भाऊराया धावून आला!

संदीप शेळकेंनी व्यक्त केली खंत, म्हणाले स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतर देखील......
 
Ss
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेगाव तालुक्यातील लासुरा येथील भिकाबाई सिरसाट यांच्या घरावरील छत ८ जून ला आलेल्या वादळाने उडून गेले. पतीचे निधन झाल्यानंतर मजुरी करून स्वकष्टाने भिकाबाईंनी सिमेंट विटांचे छोटेसे घर बांधले, शिक्षणासोबत मुलगा विशाल देखील या कामात आईला मदत करत होता. मात्र ८ जूनला आलेल्या वादळाने घराचे छत उडाल्याने दोघा मायलेकांचे सिरसाट कुटुंब संकटात सापडले. ही हळहळ वन बुलडाणा मिशन च्या कार्यकर्त्यांनी संदीप शेळकेंपर्यंत पोहचवली..अन् तातडीने सूत्र फिरली...त्याचा थेट परिणाम आज, स्वातंत्र्यदिनी दिसून आला. संदीप शेळकेंनी आज स्वातंत्र्यदिन लासुरा गावात साजरा केला, वन बुलडाणा मिशनच्या कार्यकर्त्यांनी भिकाबाईंच्या घरावर टिनाचे छत टाकण्याचे काम सुरू केले. पाहता पाहता आधी ओसाड पडलेले घर तासाभरात परिपूर्ण झाले, स्वतः संदीप शेळके यांनी देखील श्रमदान करून छतउभारणी केली.. भाषणबाजी न करता थेट कृती केल्याने सामान्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवता येते हेच संदीप शेळकेंनी त्यानिमित्ताने दाखवून दिले. "बघा माझा भाऊराया माझ्यासाठी धावून आला" हे समाधानाने सांगताना भिकाबाईंना गहिवरून आले होते..!
८ जुनला लासुरा येथे अचानक वादळी वाऱ्याने हजेरी लावली होती. यामध्ये अनेकांचे नुकसान झाले होते. श्रीमती भिकाबाई सिरसाट यांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेली होती. त्यामुळे त्यांचा संसार उघड्यावर पडला होता. त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे. पतीचे निधन झालेले आहे. मुलगा विशाल याच्यासह त्या राहतात. मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. वादळाने घरावरील टिनपत्रे उडाल्याने त्यांच्यासमोर संकट उभे ठाकले होते. 
Ss
 राजर्षी शाहू परिवाराचे सर्वेसर्वा यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली वन बुलडाणा मिशन ही एक लोकचळवळ आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि जिल्हावासीयांच्या सुख- दुःखात, संकटात धावून जाण्यासाठी वन बुलडाणा मिशनचा सदैव पुढाकार राहिला आहे. जळगाव जामोद, संग्रामपूर तालुक्यातील नुकसानग्रस्तांना वन बुलडाणा मिशनच्या वतीने सर्वतोपरी मदत पोहचवण्यात आली होती. भिकाबाईंच्या समस्येबाबत वन बुलडाणा मिशनच्या सदस्यांना माहिती मिळाली. तत्काळ मदत गोळा करण्यात आली आणि आज स्वातंत्र्यदिनी त्यांना हक्काचे छत तयार करून देण्यात आले
स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही....
 "छत उभारून दिले म्हणजे खूप मोठे काम केले असे नाही, ते आपले कर्तव्य आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ७६ वर्षानंतरही ग्रामीण भागात अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजांसाठीच झगडावे लागते ही आपल्यासाठी खेदाची बाब आहे अशी खंत यावेळी संदीप शेळके यांनी बोलून दाखवली. जिल्ह्यात आहेत त्या एमआयडीसी ओस पडलेल्या आहेत तरुणांचा हाताला काम नाही. केवळ मोठ्या गोष्टी करून थापा मारून विकास होत नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक औद्योगिक व अध्यात्मिक स्वरूपाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. यासाठी केवळ राजकारण्यांना दोष देऊन चालणार नाही तर आता समाजाने ,तरुण पिढीने विकासासाठी पुढाकार घेतला पाहिजे. सध्या आपल्याकडे कुठलाही राजाश्रय नाही मात्र तरीही वन बुलडाणा मिशन च्या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, शोषित ,वंचित समाजाचे प्रश्न सोडविणार असल्याचे संदीप शेळके यावेळी म्हणाले 
Tean
राष्ट्रगीत गातांना दाटला भिकाबाईंचा कंठ 
 स्वातंत्र्यदिनी वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून जिल्हाभर 'घर तिथे राष्ट्रगीत' हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यातील ५० हजार घरांमध्ये राष्ट्रगीताचे मंजुळ स्वर गुंजले. राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत लासुरा(ता. शेगाव) येथील श्रीमती भिकाबाई राजू सिरसाट यांच्या घरी सुद्धा सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीत गाताना भिकाबाईंचा कंठ दाटून आला होता..