जमलं बॉ..! नरेंद्र खेडेकरांच्या उमेदवारीवर २०० टक्के शिक्कामोर्तब; पक्षाचा एबी फॉर्म घेऊन जालिंधर बुधवंत, राहुल चव्हाण मुंबईवरून निघाले...

 
Chji
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): होय..शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर बुलडाणा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार राहतील हे आता १०० टक्के नव्हे तर २०० टक्के पक्क झालंय..
आज, शुक्रवारच्या मुहूर्तावर नरेंद्र खेडेकर यांच्या नावाचा एबी फॉर्म घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आणि लोकसभा समन्वयक राहुल चव्हाण मुंबईवरून निघालेत. खा.अनिल देसाई यांनी सीलबंद लिफाप्यात एबी फॉर्म बुधवंत यांना सुपूर्द केला. त्यामुळे उबाठा शिवसेनेकडून अजूनही आपल्याला उमेदवारी मिळू शकते अशी भोळी भाबडी आशा ठेवणाऱ्यांचा देखील हिरमोड झाला असणार..