Amazon Ad

डॉ.बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीचे रक्षण तुमची आमची सर्वांची जबाबदारी! संदीप शेळकेंचे प्रतिपादन; गारडगाव येथे भीम वंदना यात्रेचा समारोप! आज देऊळगावमही, देऊळगावराजात संदीप शेळकेंचा रोड शो...

 
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वन बुलडाणा मिशनचे संकल्पक तथा बुलडाणा लोकसभेचे अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांच्या संकलपनेतून काल भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती दिनानिमित्त काढण्यात आलेल्या भीम वंदना यात्रेचा समारोप गारडगाव येथील बुद्ध विहारात झाला.डॉ.बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातूर्डा ते गारडगाव अशी ही यात्रा काढण्यात आली होती, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेली ही यात्रा सुपरहिट आणि लक्षवेधी ठरली. गावागावांत भीमसैनिकांनी या यात्रेचे दिमाखदार स्वागत केले. यावेळी यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलतांना संदीप शेळके यांनी लोकशाहीच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचे प्रतिपादन केले.
   यावेळी बोलतांना संदीप शेळके म्हणाले की, पूजनीय बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या झालेल्या पातूर्डा ते गारडगाव या भीम वंदना यात्रेनंतर एका वेगळ्याच चैतन्याची अनुभूती येते आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आमच्यातून जाऊन ७७ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटलाय मात्र ते विचारांनी आजही आमच्यात जिवंत आहेत. आपल्या देशाला बाबासाहेबांनी अर्पित केलेली राज्यघटना हा अमूल्य ठेवा आहे. संविधानाचे रक्षण, लोकशाहीचे रक्षण ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. याच लोकशाही रक्षणाच्या चळवळीचा भाग म्हणूनच आता बुलढाणा लोकसभेच्या निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे ते म्हणाले. मायबाप जनतेने आशीर्वाद दिला तर डॉ. बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने काम करेल. जिल्ह्याचा सर्वांगीण आणि सर्वस्पर्शी विकास हा आपला अजेंडा आहे. समाजाच्या शोषित , वंचित घटकांना सर्वात आधी विकासाचा लाभ मिळाला पाहिजे असे ते यावेळी म्हणाले.
डॉ.बाबासाहेबांचे नाव घेऊन काही पुढारी केवळ राजकारण करतात. राजकीय फायद्यापुरता डॉ. बाबासाहेबांच्या नावाचा वापर होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. डॉ बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानाच्या रक्षणासाठी, लोकहितासाठी शेवटपर्यंत झटत राहणार असल्याचे ते म्हणाले. 
  आज देऊळगावमही, देऊळगावराजात रोड शो...
संदीप शेळके यांच्या प्रचाराला जिल्ह्यात सर्वत्र दमदार प्रतिसाद मिळत आहे. विकासाचे व्हिजन घेऊन संदीप शेळके मतदारांपुढे जात असल्याने शेळकेंचे हे वेगळेपण मतदारांना आकर्षित करीत आहे. दरम्यान आज, १५ एप्रिलला संदीप शेळके देऊळगावराजा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी देऊळगावमही व सायंकाळी देऊळगावराजात संदीप शेळके रोड शो करणार आहेत.