दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीच नसतं हे दाखवलंच! सामान्य गृहिणी ते कर्तुत्ववान आमदार;

आमदार श्वेताताईंचा हा प्रवास थक्क करणाराच! वाचा राजकारणाच्या प्रवेशापासून तर आतापर्यंतची SUCCESS STORY

 
tai

साल होत २०१३..पुढे होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी भाजपने नरेंद्र मोदींवर सोपविली होती. २३ डिसेंबर २०१३ या दिवशी मुंबईत नरेंद्र मोदी महागर्जना रॅलीला संबोधित करीत होते. याच सभेत "त्या" सामान्य नागरिक म्हणून लोकांमध्ये उपस्थित होत्या. हर हर मोदी घर घर मोदी ही घोषणा देशभर गाजत असतांनाच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत यासाठी काम करण्याचा त्यांनी त्याच दिवशी निश्चय केला अन् लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी चिखली गाठले आणि पूर्ण क्षमतेने प्रचारात स्वतःला झोकून दिले..२०१४ ला एक सामान्य गृहिणी ते  आजघडीला महाराष्ट्रातील एक दमदार आमदार असा त्यांचा अल्पावधीतला प्रवास..! विकास कशाला म्हणतात? हे त्यांनी अवघ्या मतदारसंघाला दाखवून दिलं. साडेतीन वर्षात अब्जावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील जनतेच्या पदरात पडला, खर म्हणजे एवढा निधी अन् एवढी विकासकामे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच चिखली विधानसभा मतदारसंघाच्या पारड्यात पडली अन् लोकांनीच त्यांना बिरूदावली दिली ती "विकासकन्येची"...! अर्थात हे वर्णन आहे चिखली विधानसभेच्या लोकप्रिय आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांचे..! ताईंच्या वाढदिवसानिमित्त कव्हरेज गुरू चे संचालक, बुलडाणा लाइव्ह चे जिल्हा प्रतिनिधी कृष्णा सपकाळ यांचा विशेष लेख...!
   

  अन् पहिल्याच निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या सभापती झाल्या.

   तत्कालीन कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आदेशाने २०१७ ला श्वेताताई महाले यांनी उदयनगर जिल्हा परिषद सर्कल मधून निवडणूक लढवली. निवडणुकीच्या राजकारणात नवख्या असताना सुद्धा योग्य नियोजन, आणि समाजमनाच्या वेदना हाताळण्याचा प्रामाणिक उद्देश लोकांना भावला अन् तब्बल ३२०० पेक्षा अधिक मतांनी निवडून येत त्या जिल्हा परिषदेच्या सदस्या झाल्या. जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापती म्हणून काम करण्याची संधी त्यांना मिळाली आणि जिल्हाभर वेगवेगळे उपक्रम राबवून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून गर्भवती माता आणि शिशुंची काळजी घेण्यासाठी एवढ्या योजना असतात याची माहिती श्वेताताईंच्या कार्यकाळातच जिल्हावासियांना माहीत झाली. ताईंच्या याच कामाची दखल भाजपने घेतली. १० वर्षांपासून चिखली विधानसभा मतदारसंघावर एकहाती अधिराज्य गाजवणाऱ्या काँग्रेसच्या राहुल बोंद्रेंच्या विरोधात भाजपने श्वेताताईंना विधानसभेची उमेदवारी दिली. पक्षनेतृत्वाने दाखवलेला विश्वास सामान्य कार्यकर्त्यांच्या ताकदीच्या बळावर श्वेताताईंनी सार्थ ठरवत ९३ हजार ५१५ मते मिळवली आणि श्वेताताई आमदार झाल्या.
    
महाविकासआघाडी सरकारने निधी रोखला पण....

  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप क्रमांक एकचा पक्ष होऊनही राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. सोबतीला कोरोनासारखे महासंकट होतेच. कोरोनाचे कारण पुढे करून राज्य सरकारने विकासकामे थांबवली होती, त्यातही विरोधी पक्षाच्या आमदारांना विकासनिधी मिळूच नये यासाठीही डाव रचल्या गेला होता. चिखली विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीनेही थैमान घातले होते. मात्र एवढ्या विपरित परिस्थितीला आमदार श्वेताताईनी धाडसाने तोंड दिले. सकाळी ६ वाजेपासून रात्री १२ पर्यंत आमदार श्वेताताई मतदारसंघात पायाला भिंगरी लागल्यात फिरत होत्या. कधी  चिखल तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सरकारच्या धोरणांनी खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देत होत्या तर कधी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्त गावात तसेच कोविड सेंटरवर जाऊन रुग्णांशी संवाद साधून अडचणी समजून घेत होत्या. सरकारच्या भरवश्यावर न राहता आमदार श्वेताताईंनी कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर कोविड सेंटर सुरू केले.कोविडमुळे अतिगंभिर अवस्थेतील शेकडो रुग्णांच्या वैद्यकीय उपचाराची व्यवस्था मोठ्या शहरातील रुग्णालयात आमदार श्वेताताईंनी केली. तत्कालीन सरकारने आ. श्र्वेताताईंचा विकासनिधी रोखला मात्र जनसामान्यांच्या मनातील आ. श्वेताताईंचे स्थान मात्र अधिकच उजळून निघाले...!

मतदारसंघात नारीशक्तीचा जागर..!

  यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः ।
यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलाः क्रियाः ।। जिथे मातृशक्तीचा सन्मान होतो तिथेच देवांचे वास्तव्य असते ही भारतीय संस्कृतीची शिकवण..त्यामुळेच ही शिकवण जनमानसात रुजली पाहिजे यासाठी 
नवरात्री उत्सवानिमित्त समाजातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्याची सुरुवात आ. श्वेताताईंनी केली. विशेष म्हणजे नारीशक्तीचा असा जागर करणाऱ्या आ. श्वेताताई जिल्ह्यातील पहिल्याच आमदार  ठरल्या आहेत. महिला आहोत म्हणून आम्ही कुठे कमी नाही..ठरवलं तर आम्हीही काहीही करू शकतो ही प्रेरणाच अनेक तरुणींना, मुलींना या उपक्रमाच्या माध्यमातून मिळाली.

  उंद्रीचे केले उदयनगर...!

चिखली तालुक्यातील उंद्री गावाचे नाव बदलण्यात यावे ही स्थानिक नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी. आधीच्या आमदारांकडे विनवण्या करून - करून नागरिक थकले. मात्र तिथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतरच श्वेताताईंनी त्यासाठीचा पाठपुरावा शासनदरबारी सुरू केला. अखेर आ. श्वेताताईंच्या प्रयत्नांना यश मिळालेच. गावकऱ्यांच्या अनेक दशकांच्या लढ्याचे नेतृत्व करून आमदार श्वेताताईंनी उंद्री चे उदयनगर करून दाखवले..!

  रस्त्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी..!

चिखलीच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागाअंतर्गत येणाऱ्या मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी आ. श्वेताताईंनी शासनदरबारी नेहमीच पाठपुरावा केला. २६२ किलोमिटरच्या रस्त्यांसाठी आ. श्वेताताईंच्या प्रयत्नातून तब्बल १९ हजार ४०८ लक्ष रुपयांपेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आला. केवळ निधी मंजूर करून घेण्यावर आ. श्वेताताई थांबल्या नाहीत तर त्या कामांची  प्रत्यक्ष अंमलबजावणी आ. श्वेताताईंनी अधिकाऱ्यांकडून करून घेतली. यासह मतदासंघातील पुलांच्या कामांसाठी नाबार्ड अंतर्गत २०८० लक्ष  रुपयांचा निधी आमदार श्वेताताईंच्या प्रयत्नातून मतदारसंघाच्या वाट्याला आला..! केंद्रीय मार्ग निधीतून मतदारसंघातील रस्ते पुलांच्या कामांसाठी २१८२ लक्ष  तर विशेष दुरुस्तीसाठी ३३३९ लक्ष रुपयांचा निधी आमदार श्वेताताईंनी खेचून आणला.

swetatai

  जिल्हा मार्गांचा दर्जा वाढवला..!

रस्ते म्हणजे विकासाच्या वाहिन्याच..जेवढे रस्ते चांगले तेवढा त्या भागाचा विकास अधिक..हेच हेरून आमदार झाल्यापासूनच ग्रामीण भागातील रस्ते दर्जेदार झाले पाहिजेत यासाठी श्वेताताई प्रयत्नरत आहे.  शेतीपूरक व्यवसाय व उद्योगधंद्याच्या वाढीसाठी ग्रामीण रस्त्यांना जर राज्य मार्गाचा दर्जा मिळाला तर निधीसह अनेक प्रश्न निकाली निघणार होते. शासनदरबारी आ. श्वेताताई त्यासाठी पाठपुरावा करीत होत्या. दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर अशक्य असं काहीच नसत हेच आमदार श्वेताताईंच्या प्रयत्नांतून पुन्हा दिसले आणि चिखली विधानसभा मतदारसंघातील ७५ गावांमधून जाणाऱ्या ३१७ किमी लांबीच्या जिल्हा मार्गांना आमदार श्वेताताईंनी राज्यमार्गाचा दर्जा मिळवून दिला. यामध्ये धोडप ,पेठ, एकलारा, अंबाशी, चंदनपूर तसेच गिरोला, सवणा, दिवठाणा, बोरगाव वसू, खंडाळा मकरध्वज, भालगाव, रोहडा, काटोडा, रानअंत्री, हिवरखेडा, आमखेडा, करतवाडी, टाकरखेड, करवंड, उदयनगर, तोरणवाडा, असोला नाईक, किन्ही नाईक, वडाळी मांडवा, पारखेड, पाथर्डी, घाटबोरी, टेंभूरखेडा, कोलारी, हातणी, वळती, सोमठाणा, मुंगसरी, खैरव, गांगलगाव, तराळखेड, मासरुळ, धामणगाव, डोंबरुळ, टाकळी, कुंभेफळ, कुलमखेड, मौढाळा, म्हसला बु,बोधेगाव, चांडोळ, भडगाव  यासह इतर गावांमधून जाणाऱ्या रस्त्यांचा समावेश आहे.

  शेत तिथे गारामुक्त पांधनरस्ता..!

 शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवायचे असेल तर शेतरस्त्यांच्या  सोयी अतिशय महत्वाच्या ठरतात. शेतमालाची वाहतूक तसेच इतर शेतीकांमासाठी अवजारे, यंत्र शेतात न्यायची असेल तर शेतरस्ता चांगला हवाच. यामुळेच आ. श्वेताताईंनी पांदनरस्त्यांच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात अनेक रस्ते लोकसहभागातून पूर्णत्वास नेले. त्यानंतरच्या काळात मातोश्री ग्रामसमृद्धी शेतपांदनरस्ते  योजनेअंतर्गत एकूण ४३४ किमी लांबीच्या योजनाबाह्य पांदन रस्त्यांना योजनेत समाविष्ट करून ग्रामीण रस्त्यांचा दर्जा मिळवून दिला. त्यामुळे आता या रस्त्यांच्या विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे. या रस्त्यांसाठी सुद्धा आगामी काळात निधी उपलब्ध करण्यावर आ. श्वेताताईंचा भर असणार आहे.

  बेरोजगारांना दिला रोजगार..!
 
विकासकामासोबतच तरुणांच्या हाताला रोजगार देण्यावर सुद्धा आ. श्वेताताईंनी विशेष भर दिला. ताईंचे दिवंगत सासरे स्व. दयासागरजी महाले यांच्या स्मरणार्थ ताई व कुटुंबियांच्या पुढाकारातून उदयनगर येथे आयटीआय कॉलेज उभारण्यात आले. यामध्यमातून रोजगाराभिमुख उपक्रम राबविले जातात. नुकत्याच पार पडलेल्या रोजगार मेळाव्यात ४५० हून अधिक तरुणांना जागेवरच विविध खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून नोकरीचे नियुक्तीपत्र देऊन रोजगार उपलब्ध करून देण्यात आला.

  ५६० हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येणार..!

मतदासंघातील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. श्वेताताई महाले प्रयत्नशील आहेत. २३ द्वारयुक्त बंधाऱ्यांच्या माध्यमातून मतदारसंघातील विविध गावातील ४१४ हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येणार असून त्यासाठी १९ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय ५ पाझर तलावांच्या माध्यमातून १५० हेक्टर शेतजमीन ओलीताखाली येणार आहे. त्यासाठी ८ कोटी रूपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.
    
  कृष्णा सपकाळ/ जिल्हा प्रतिनिधी ,बुलडाणा लाइव्ह ८६९८४७४०६२