विश्वगुरू होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल! खा.प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन; महायुतीला मतदान करण्याची विनंती!मोताळा शहरात कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद

 
Ghjjj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शिवसेना ,भाजपा, राष्ट्रवादी, रिपाई आठवले गट, पिरीपा, रासप आदी मित्र पक्षाच्या महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव मोताळा शहरामध्ये कॉर्नर बैठका घेतल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचा उमेदवार म्हणून मला आपले प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असे आवाहन यावेळी त्यांनी केले. 

याप्रसंगी बोलताना खासदार प्रतापराव जाधव म्हणाले की, मागील दहा वर्षांमध्ये पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर सुद्धा भारताची मान उंचावली आहे, भारत हा जगामधली पाचवी आर्थिक महासत्ता बनला असून विश्वगुरू होण्याच्या दृष्टीने भारताची वाटचाल सुरू आहे. हे करत असताना सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या तत्त्वावर कार्य करून समाजातील प्रत्येक घटकाचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने एनडीए  सरकार  कार्य करत आहे. अबकी बार ४०० पार हा केवळ नारा ४०० च्या वर खासदार निवडून येणारच आहेत. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत हे संपूर्ण भारत वासियांची इच्छा असून ती पूर्ण करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातून सुद्धा महायुतीचा उमेदवार विजयी झाला पाहिजे. यासाठी आपले प्रतिनिधित्व करायचे संधी मला द्या अशी विनंती खा.जाधव यांनी केली. मागील पंधरा वर्षापासून मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना अनेक योजना आपण आणल्या, विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लागले, भविष्यामध्ये जालना खामगाव रेल्वे मार्ग, वैनगंगा ते पैनगंगा असे महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्प हे पूर्ण होणार असून त्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकारची सुद्धा मान्यता मिळालेली आहे असेही यावेळी खा.जाधव म्हणाले.

 यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांच्या समवेत भाजपा नेते योगेंद्र गोडे,बलदेवराव चोपडे. साहेबराव फासे, शरद चंद्र पाटील, विश्वास पाटील, यशवंत धाबे, सुरेश खर्चे, गणेश पाटील, प्रदीप जैन, गणेश झंवर, सचिन हिरोडे, प्रवीण जवरे, प्रवीण निमकर्डे. विजय सुरडकर, सौ लताताई पारस्कर, रामेश्वर पाटील, निना घनोकार, अनिता झंवर, जयश्रीताई रहाणे, मधुकर घडेकर, राजेश आढाव, बाबा कुरेशी, रमेश शेठ सदानी, सुरेश मापारी, भिकमचंद झंवर, शेख मोबीन, पृथ्वीराज गायकवाड, भूषण वानखेडे, गजानन मातडे, प्रवीण पाटील,  राजू देशमुख उपस्थित होते.