भारतीय भाट समाजाने केला खा. प्रतापराव जाधवांच्या वक्तव्याचा निषेध! समाज बांधव म्हणतात, जाधव साहेब माफी मागा..माफी! वाचा काय आहे कारण..
आज २० फेब्रुवारी २०२३ रोजी मोताळा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे. की खासदार मा. प्रतापराव जाधव यांनी संजय राऊत हा उद्धव ठाकरेचा भाट आहे असा उल्लेख केलेला आहे.
यामुळे अखिल भारतीय भाट समाजाच्या भावना दुखावल्या आहे. त्यामुळे अखिल भारतीय भाट समाज या विधानाला तीव्र संताप व जाहीर निषेध करतो. त्यामुळे या विधानाबाबात प्रतापराव जाधव यांनी माफी मागावी, अन्यथा अखिल भारतीय भाट समाजाकडून लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाच्या अंती देण्यात आला आहे.निवेदनावर प्रमोद नवले, धनंजय चोपडे, जुगल नवले, सुधीर चोपडे, संदीप नवले, अशोक सोनुने, नंदकिशोर शिरसाट, मयुर सोनुने, किसन शिरसाट, मुकुल नवले, कैलास सोनुने, ज्ञानेश्वर नवले यांच्या सह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.