अपक्ष उमेदवार गजानन धांडे प्रचारासाठी बुलढाणा तालुक्यातील गावोगावी! मुलाच्या प्रचारासाठी आईचे आवाहन म्हणाल्या, सामान्य घरातील "सामान्य" लेकराला संधी द्या...

 
Hdj

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सामान्य माणसाचा आवाज दिल्ली दरबारी पोहोचवण्यासाठी अपक्ष उमेदवार गजानन जनार्दन धांडे लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. काल बुलढाण्यातून संत गजानन महाराजांचे मंदिरातून पूजा अर्चना करून त्यांनी प्रचाराचे नारळ फोडले. आज सकाळीच ते प्रचारासाठी सागवान, कोलवड, तांदुळवाडी या गावांत दाखल झाले, दरम्यान ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांना मिळाला. सामान्य माणसाला जनतेचे प्रतिनिधित्व करण्याची संधी जनतेने द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

  यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधत ते म्हणाले, की आजवर जिल्ह्याचा विकास का खुंटला? या प्रश्नावर आपण चिंतन करायला हवे. विकासाचे खोटे आश्वासन देवून जनतेची आतापर्यंत निराशाच झाली आहे. सर्वांगीण विकासाचे ध्येय बाळगून निवडणूक लढतोय. त्यामुळे आपल्या परिवारातला एक माणूस म्हणून जनतेने संधी द्यावी असे आवाहन त्यांनी केले. आजही जिल्ह्यात पाहिजे तसा विकास झालेला नाही, नदीजोड प्रकल्पाचे कागदी घोडे नाचत आहे. सिंचनाचा विषय मार्गी लागलेला नाही. ऐन निवडणूक आली की, केवळ घोषणा केल्या जातात. त्यावर पूर्णपणे अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही. जनतेने आपल्या घरातला, हक्काचा माणूस म्हणून एकदा संधी द्यावी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे असा शब्द धांडे यांनी दिला. पत्रकारिता, क्रीडा, आध्यात्मिक क्षेत्रात गजानन धांडे यांचा नावलौकिक आहे. विशेष म्हणजे कालपासून त्यांनी सुरू केलेल्या प्रचारात त्यांच्या आई सहभागी आहेत. त्यादेखील गावोगावी जाऊन मुलाचा प्रचार करत आहेत. सामान्य घरातील सामान्य लेकराला निवडून द्या असे आवाहन त्यांनी जनतेला केले.