शेगावात फडणवीसांनी राजकीय प्रश्नांना दिली बगल; म्हणाले, मंदिरात....

 
fadvnis

शेगाव( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):विदर्भ प्रदेश अभिवक्ता परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शेगावात होते. कार्यक्रमापूर्वी त्यांनी संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.  दरम्यान समयसूचकतेणे उत्तरे कशी द्यावी ? हे फडणवीस यांनी दाखवून दिले.  फडणवीस यांनी 'आपण मुरलेले राजकारणी असल्याचे शेगावात आज दाखवून दिले.

 झाले असे की,  दीर्घ कालावधी पासून त्यांची वाट पाहणाऱ्या माध्यम प्रतिनिधींनी त्यांना घेरले होते. माध्यम प्रतिनिधींनी नवाब मलिकांवर  प्रश्न उपस्थित केला असता, ते म्हणाले "मंदिर परिसरात राजकीय प्रश्नाची कोणतीही उत्तरे मला देता येणार नाही" असे सांगून त्यांनी विनम्रपणे नकार दिला आणि राजकीय काहीच बोलले नाही.

   मात्र मलिकांविषयी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी  टाकलेला लेटर बॉम्बचा आवाज राजकीय वर्तुळात अजुनही किर्र.. असा ऐकू येतोय. सोबतच भाजपच्या काही नेत्यांनी विधान भवनाच्या उपस्थितीवरून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांना निशाण्यावर घेतले आहे. दरम्यान नवाब मलिक अजित पवारांसोबत असल्याचे सांगितल्यानंतर, महायुतीत खळबळ उडाली होती.