Amazon Ad

मासरूळमध्ये संविधानाच्या जागराला एकवटली ग्रामीण भागातील नारीशक्ती! राहुल बोंद्रे म्हणाले, संविधान आणि लोकशाही धोक्यात आणणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा;

१ टक्के श्रीमंताच्या घशात देशाची अर्धी संपत्ती टाकण्याचा भाजपचा डाव आहे म्हणाले...
 
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देशातील विरोधी पक्षांचा आवाज दडपून संविधान आणि लोकशाही व्यवस्था धोक्यात आणुन जागतीक स्तरावर देशाला कर्जबाजारीच्या खोल दरीत ढकलण्याचे काम भाजपाच्या मोदी सरकारने गत 9 वर्षात केले आहे. अच्छे दिन येण्याच्या फसव्या घोषणा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेसह शेतकरी, बेरोजगारांच्या हातावर तुरीचं दिल्याचा अनुभव देशवासियांना येत आहे. संविधान आणि लोकशाही धोक्यात आणनाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा असे आवाहन संविधान पालखी घेवुन मासरूळ जि.प.सर्कल मध्ये ग्रामस्थांशी संवाद साधतांना बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. चिखली विधानसभा मतदार संघात काढलेल्या संविधान जागर यात्रेला ग्रामीण जनतेचा भरभरून प्रतिसाद लाभत असतांना संविधानाच्या या जागराला आता नारीशक्तीही एकवटली असुन यात्रेत महिलांची प्रचंड उपस्थिती पहावसयास मिळत आहे.
 

चिखली मतदार संघातुन काढण्यात आलेल्या संविधान जागर यात्रेच्या आठव्या दिवशी ही संविधान पालखी दहिद खुर्द येथुन सकाळी जामठी, वरूड, सोयगांव, मासरूळ, धामणगांव, डोमरूळ, धाड व ढालसावंगी येथे पोहचली. बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे हे संविधान पालखी व लोकशाहीची मशाल घेवुन उपरोक्त गावातुन यात्रे दरम्यान प्रवास करीत ग्रामीण भागातील नागरीकांशी थेट संवाद साधुन संविधानाचे महत्व पटवुन देत आहेत. या यात्रेत संविधानाची पालखी खांदयावर घेवुन राहुल  बोंद्रे व त्यांच्या सहकार्याच्या खादयांला खांदा लावुन त्यांच्या सुविज्ञ पत्नी अड. सौ. वृषालीताई बोंद्रे हया सुध्दा संविधानाचा जागर करीत असुन संविधान पालखीच्या माध्यमातुन लोकशाही व संविधानाच्या रक्षणार्थ ग्रामीण व शहरी नारीशक्ती एकवटल्याचे यात्रेतील असंख्य महिलांच्या उपस्थितीने दिसुन येत आहे. यावेळी गावोगावी संविधान पालखीचे उत्स्फुर्तेने स्वागत करण्यात येत असुन वयोवृध्द महिला पुरूषांसह अपंग महिला व पुरूष स्वयंस्फुर्तीने सहभागी होवुन यात्रेला मोठया प्रमाणात प्रतिसाद देत आहेत.


ग्रामीण जनतेशी संवाद साधतांना माजी आमदार राहुल बोंद्रे पुढे म्हणाले ‘अच्छे दिन’ येणारची फसवी स्वप्ने दाखवीत लबाडी करत सत्ता काबीज करणा-या मोदी सरकारला तब्बल ९ वर्ष उलटुन गेले तरी देखील देशातील गरीबी हटली नाही, महागाई संपली नाही, शेतक-यांच्या शेतमालाला योग्य भाव नाही, बेरोजगारांची समस्या दिवसागणिक वाढतच आहे. जिवनावश्यक वस्तूंवर कर लावणारं जगातलं पहिलं सरकार म्हणजेच भाजपाचं मोदी सरकार आहे. गॅंस, पेट्रोल, डिझेल, खत  बियाण्यांची प्रचंड दरवाढ करून १ टक्के श्रीमंताच्या घश्यात देशाची अर्धी संपत्ती घालुन देशात आर्थीक विषमता निर्माण केली. जाती जातीत व्देष पसरवीत विरोधी पक्षांचा आवाज दडपवून लोकशाही व्यवस्था धोक्यात आणली जात आहे. जनतेची होणारी लुट थांबवायची असेल आणी देशात लोकशाही टिकवुन संविधान अबाधीत राहीले पाहीजे तर त्यासाठी देशहीत विरोधी मोदी सरकारला घरचा रस्ता दाखविल्याशिवाय पर्याय नसल्याचे राहुल बोंद्रे यावेळी म्हणाले. यात्रेदरम्यान गावोगावी कॉग्रेसच्या विविध युवक कॉग्रेस, महिला कॉग्रेस, मागासवर्गीय कॉग्रेस व ग्राम संविधान शाखांचे पुर्नगठन करून नामफलकांचे अनावरण याप्रसंगी राहुल बोंद्रेंच्या हस्ते करण्यात आले. यात्रे दरम्यान गावोगावी प्रचंड अतिषबाजी, पुष्पवृष्टी करीत ढोलताशे आदीच्या गजरात यात्रेचे प्रचंड उत्साहात स्वागत करण्यात आले. गावा गावात वयोवृध्द नागरीक तथा माजी सैनिकांचा सन्मान पत्र देवुन सत्कार करण्यात आला. या संविधान यात्रेत कॉग्रेसच्या विविध शाखा, सेल, विभाग, फ्रंटलचे प्रमुख उपदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची भल्या पहटेपासुन रात्री यात्रेच्या समारोपा पर्यंत मोठया संखेने उपस्थिती असल्याचे दिसुन येत आहे.