जिल्ह्याच्या विकासाचं करायचंय फोटोशूट! असा जिल्हा घडवू की जगाला हेवा वाटेल; कॅमेरा निशाणी मिळाल्यानंतर संदीप शेळकेंची पहिली प्रतिक्रिया...

 
Camera
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. जिल्ह्याचा सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी विकास हेच आपले ध्येय आहे. जगाला हेवा वाटावा असा जिल्हा घडवणार आहे, जिल्ह्याच्या विकासाचे फोटो शूट करायचे आहे अशी प्रतिक्रिया "कॅमेरा" निशाणी मिळाल्यानंतर वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी दिली आहे.
  निवडणूक आयोगाने आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले. यात संदीप शेळकेंना कॅमेरा हे चिन्ह मिळाले आहे. दरम्यान माध्यमांनी संदीप शेळके यांना पहिली प्रतिक्रिया विचारली असता "याच कॅमेऱ्याने आपल्याला जिल्ह्याच्या विकासाचे फोटोशूट करायचे आहे. जगाला हेवा वाटावा असा जिल्हा आपल्याला घडवायचा आहे, जिल्ह्याला पर्यटन समृध्द, रोजगार समृध्द , कृषी समृध्द करायचे आहे. अशा सर्वांग सुंदर समृध्द जिल्ह्याचे फोटोशूट याच कॅमेऱ्याच्या सहाय्याने करायचे आहेत असे संदीप शेळके म्हणाले..