आमदार राजेश एकडे म्हणाले, मला निरोप मिळाला पण मी बुलडाण्याच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही! मलकापूर, नांदुऱ्यात करणार रास्तारोको!

कार्यक्रमस्थळी सत्ताधारी पक्षांचे झेंडे लावण्यावरुनही नाराजी...
 
ffffd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात आज शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज बुलडाण्यात येणार आहेत. मात्र या कार्यक्रमात अडचणी वाढत आहेत. सकल मराठा समाजाच्या वतीने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. जालन्यात मराठा आंदोलनकांवर झालेल्या लाठीचार्ज मुळे महाविकास आघाडी देखील रास्तारोको आंदोलन करणार आहे. त्यातच आता विरोधी पक्षाच्या जिल्ह्यातील लोकप्रतीनिधिंनी देखील कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
 

psc

मलकापूरचे आमदार राजेश एकडे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. " प्रशासनाने आपल्याला कार्यक्रमाचा निरोप दिला आहे, मात्र आपण महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित रास्तारोको आंदोलनात सहभागी होणार आहोत" असे राजेश एकडे यांनी बुलडाणा लाइव्ह ला सांगितले. हा कार्यक्रम शासकीय आहे, त्यामुळे आम्हाला निमंत्रण मिळाले मात्र कार्यक्रमाच्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचे झेंडे लावायला कुण्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली, किंवा झेंडे लावणाऱ्यांवर कारवाई का नाही केली असा सवालही राजेश एकडे यांनी उपस्थित केला आहे.