लोकहितासाठी सामान्य माणसाची लढाई लढतोय ! अपक्ष उमेदवार गजानन धांडे यांचे प्रतिपादन; प्रचाराचा केला शुभारंभ
Apr 11, 2024, 20:06 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): लोकहिताच्या विकास कामाकडे सातत्याने होत असलेले दुर्लक्ष पाहता सामान्य माणसाची लढाई बुलंद करण्यासाठी आपण निवडणुकीच्या मैदानात असल्याचे प्रतिपादन बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गजानन धांडे यांनी केले. संत श्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडत त्यांनी गावोगावी पोहोचण्याचा आपला दौरा सुरू केला आहे.
मोताळा तालुक्यातील खडकी, खामखेड, राहेरा, डाभा, नळकुंड, नाईक नगर ,उबालखेड, कुऱ्हा गोतमारा, हनवत खेड , कोराळा बाजार , खेडी पानेरा, किनोळा धामणगाव बढे सह परिसरातील गावांमध्ये त्यांनी डोअर टू डोअर जात प्रचार साधला. विकासाच्या कामासाठी चौफेर फटकेबाजी आवश्यक आहे. यावेळी मारुतीभाऊ ढकचवळे, सुरेशराव मुसळे, शिवाजीराव पवार, गजानन ठाकूर, शिवाजीराव गुलगुले यांचे सह अन्य सहकाऱ्यांची उपस्थिती होती.