दुसरबीड मध्ये पंकजाताईंच्या सभेला तुडूंब गर्दी! खा.प्रतापराव जाधवांना विजयी करण्याचे पंकजाताईंचे आवाहन!

म्हणाल्या, मी माझ्या प्रचारातून वेळ काढून इकडे आले, याचे महत्व समजा! देश केवळ नरेंद्र मोदींच्या हाती सुरक्षित असल्याचे प्रतिपादन! खा.जाधवांच्या विजयाची सभा घ्यायलाही येणार 
 
दुसरबीड
दुसरबीड(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): देश केवळ आणि केवळ नरेंद्र मोदींच्या हातात सुरक्षित आहे . देशासमोर अनेक प्रश्न असले तरी लोकांना अपेक्षा केवळ नरेंद्र मोदींकडूनच आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आधी प्रतापराव जाधव यांना निवडून आणा, प्रचंड बहुमताने त्यांना विजयी करा. विजयानंतरची सभा घ्यायला मी पुन्हा बुलडाणा जिल्ह्यात येईल, ती सभा मातृतीर्थ सिंदखेडराजा नगरीत संपन्न होईल असे प्रतिपादन भाजपच्या स्टार नेत्या पंकजाताई मुंडे यांनी केले खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ आज दुसरबीड येथे आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर महायुतीचे उमेदवार खासदार प्रतापराव जाधव, आ डॉ.राजेंद्र शिंगणे, आ. श्वेताताई महाले,भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ .गणेश मांटे ,माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार विजयराज शिंदे, विनोद वाघ यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील ही सभा अतिवराट, अतिविशाल अशीच ठरली. पंकजाताईंना ऐकण्यासाठी विशाल जनसमुदाय जमला होता.
Advt
Advt.👆
यावेळी पुढे बोलतांना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, मी स्वतः उमेदवार असतांना देखील गोपीनाथ मुंडे यांची लेक असल्याचे भान ठेवून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराची जबाबदारी घेतली आहे. स्वतःच्या निवडणुकीचा प्रचार बाजूला ठेवून मी आज प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी आली आहे हे ध्यानात घ्या, कारण ही देशाची निवडणूक आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर निधनानंतरचा राज्यात संघर्ष यात्रा काढली तेव्हा लोकांनी भरभरून आशीर्वाद दिले. बीड जिल्ह्याची पालकमंत्री आणि राज्याची ग्रामीण विकास मंत्री झाले. जेवढा विकास मी बीड जिल्ह्याचा केला तेवढाच मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघाचा केला असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. लहानपणीचा किस्सा सांगताना पंकजाताई म्हणाल्या की, वडील मला मुंडे साहेब नेहमीच म्हणायचे की,मी तुला सिंदखेड राजातून उभा करणार. मागच्या वेळेस देखील खा. प्रतापराव जाधव साहेबांच्या प्रचारासाठी आल्याची आठवणही पंकजाताईंनी सांगितली. जाधव परिवाराचे आणि मुंडे परिवाराचे हे ऋणानुबंध अनेक वर्षाचे आहेत. बुलडाणा लोकसभा मतदारसंघात धनुष्यबाणाला मतदान व्हावे यासाठीच मुंडे साहेबांच्या वतीने मी आली आहे असे पंकजाताई म्हणाल्या. यावेळी खासदार प्रतापराव जाधव यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, जाधव साहेब तुम्ही खासदार झाल्यानंतर पहिल्यांदा सिंदखेड राजा नगरीचा विकास करा , तुम्हाला कशाचीच कमी पडणार नाही. पुढे बोलतांना त्या म्हणाल्या की प्रतापराव जाधव निवडून आल्यानंतर या सगळ्या मतांचा सन्मान करतील. विकासापासून त्यांच्या कार्याची सुरुवात करतील. देशाला जगातील सर्वात मोठी आर्थिक महाशक्ती बनवायची असेल तर नरेंद्र मोदी शिवाय पर्याय नाही, त्यामुळे मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आधी प्रतापराव जाधव यांना विजयी करा. मी पुन्हा विजयाची सभा घेण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात येईल असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
 
या सभेने विजय सुकर झाला: डॉ राजेंद्र शिंगणे
  या सभेत सहभागी झालेला मोठा जनसमूह आणि स्टार प्रचारक पंकजाताई मुंडे यांची विशेष उपस्थिती लाभल्याने खा. प्रतापराव जाधव यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे असे आ. डॉ.राजेंद्र शिंगणे म्हणाले. जिल्ह्यातील ७० टक्के शेतीला पाणी पुरवण्यासाठी पैनगंगा ते वैनगंगा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्यक्षात या प्रकल्पाला साकार करण्यासाठी प्रतापराव जाधव यांना विजयी करायचे आहे. तसेच राज्यात शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांचा उत्तम मेळ बसल्याने राज्यात विकासाचा रथ धावणार असल्याचे डॉ. शिंगणे म्हणाले. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रतापराव जाधव त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहनही आ. डॉ राजेंद्र शिंगणे यांनी केले.