"लावा किती ताकद, आम्ही नाही वाकत..."! आमदार संजय गायकवाड समर्थकांची पोस्ट चर्चेत! ईशारा कुणाला?

 
Add
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड सातत्याने चर्चेत असताना. गेल्या आठवड्या - पंधरवाड्यात लोकसभा उमेदवारीचे संकेत देणाऱ्या पोस्ट आमदार गायकवाड यांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियावर झळकत होत्या. दरम्यान कालपासून आ.गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. २०१२ च्या एका हाणामारीच्या प्रकरणात त्यांच्याविरोधात न्यायालयाने अटक वॉरंट काढलेले आहे.
Add
आमदार गायकवाड यांच्यासह त्यांचे कुटुंबीय व निकटवर्तीय अशा एकूण १७ जणांविरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात २०१२ मध्ये
कलम १४३, १४७, १४८, १४९,३०७,५०४, ५०६ आणि आर्म ॲक्ट कलम ४ व २५ व मुंबई पोलीस अधिनियम कलम १३५ नुसार गुन्हे दाखल आहेत. प्रकरण ९ जानेवारी २०१३ ला न्यायालयात दाखल झाले होते. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना आ.गायकवाड गटातील १७ जण न्यायालयीन तारखांना गैरहजर राहिले. त्यामुळे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.एन.मेहेत्रे यांनी १९ ऑक्टोबर २०२३ रोजी आमदार गायकवाड यांच्यासह १७ जणांविरुद्ध अटक वॉरंट काढले. काल, १७ पैकी १४ जणांनी अटक वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन जप्त करीत न्यायालयीन कोठडीत आदेश दिले. त्यानंतर आरोपींच्या वतीने पुन्हा जामीनासाठी अर्ज केल्यानंतर त्यावरील सुनावणी संपल्यानंतर रात्री उशिरा जामीन मंजुर करण्यात आला होता. मात्र अद्याप आमदार संजय गायकवाड यांच्यावरील अटक वॉरंट अद्याप कायम आहे. अटक टाळण्यासाठी आमदार संजय गायकवाड यांना स्वतः न्यायालयात हजर रहावे लागणार आहे, सोमवारी यावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी होण्याची शक्यता आहे. आमदार संजय गायकवाड लोकप्रतिनिधी असल्याने त्यांना एवढी सहजासहज अटक होण्याची शक्यता कमीच आहे. मात्र सोमवारी न्यायालयात काय होते यावर बरेच काही अवलंबून आहे.
Add
Add
 लावा किती ताकद आम्ही वाकत...
दरम्यान कालच्या या घडामोडीनंतर आज आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून "लावा किती ताकद आम्ही नाही वाकत" असे स्टेटस व्हायरल होत आहेत. व्हायरल स्टेट्स मध्ये आमदार संजय गायकवाड आणि कुणाल गायकवाड यांचे फोटो आहेत..त्यावर धर्मवीर असे लिहिलेले आहे आणि बॅकग्राउंड ला "लावा किती ताकद आम्ही नाही वाकत" या गाण्याचा ऑडियो आहे..! सध्या या स्टेटसची जोरदार चर्चा आहे. आमदार गायकवाड यांच्याकडून हा कुणाला इशारा आहे यावर चर्चा रंगली आहे..!