अहो ऐकलं का? बुलडाणा विधानसभा मतदारसंघात ६ नवीन मतदार केंद्र! कुठे आहेत नवीन केंद्र? वाचा...

 
Jilha
बुलडाणा(जिमाका:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणूक आयोगाने दिनांक १ जुलै २०२४ अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहिर केला आहे. या कार्यक्रमानुसार मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करण्यात आले आहे. त्यानुसार बुलडाणा विधानसभा मतदारसंघात ६ नवीन मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे.
नव्याने निर्माण केलेल्या मतदारकेंद्राचा नाव व क्रमांक
* ७५ जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा खोली क्र. ३, 
* गजानन महाराज मंदिराजवळ, मोताळा.
* १०९ जिल्हा परिषद प्रायमरी शाळा, रामगाव.
* १३६ जिल्हा परिषद प्रायमरी शाळा, नेहरुनगर, 
* २३३ जिल्हा परिषद मराठी प्रायमरी शाळा खोली क्र. १, गोंधनखेड,
* २४८ जिल्हा परिषद मराठी प्रायमरी शाळा, हनवतखेड,
* २९२ जिल्हा परिषद मराठी प्रायमरी शाळा, अफजलपूरवाडी ही सहा नव्याने निर्माण केलेली मतदान केंद्र आहेत.
नव्याने निर्माण झालेल्या मतदान केंद्राबाबत, तसेच २८ मतदान केंद्रांच्या ठिकाणात बदल करण्यात आले आहे. मतदार केंद्रांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमानुसार ६ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. दि. २० ऑगस्टपर्यंत नागरिकांनी दावे व हरकती दाखल करता येणार आहे. मतदार यादी अंतिम प्रसिद्धी दि. ३० ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. ही यादी विधानसभा निवडणूकीसाठी उपयोगात आणली जाणार असल्याने नागरिकांनी मतदारयादीत आपले नाव असलयाची खात्री करावी. असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार व्ही. एस. कुमरे यांनी केले आहे.